माणवासीयांसारखी प्रेमळ माणसं इतर कुठेही नाहीत : सपोनि राजकुमार भुजबळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दहिवडी प्रतिनिधी | आकाश दडस

दहिवडी येथे लोकसहभागातून पोलीस स्टेशनच्या वास्तुचे नुतनीकरण व सुशोभीकरण करण्यात आले. माणवासियांना आवाहन केले, तेव्हा भरभरून प्रतिसाद मिळाला. मी काम करत असताना माण तालुक्यातील जनतेने व शासनाने वेळोवेळी सहकार्य केल्यामुळे चांगल्या प्रकारे काम करू शकलो. माणवासीयांसारखी प्रेमळ माणसं इतर कुठेही नाहीत, असे भावनिक उदगार सहाय्यक पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांनी काढले.

दहिवडी येथे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ व पोलिस उपनिरीक्षक प्रमोद दीक्षित या दोन पोलिस अधिकाऱ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात नायब तहसीलदार करे, गोंदवले बु. पोलीस पाटील आशा भोसले, महिला पोलीस नाईक नीता पळे, शाहीर महावीर शिंदे, विरभद्र कावडे, ठाणे अंमलदार अशोक हजारे, संदीप खाडे आदी मान्यवरांनी आपली मनोगते मांडली.

पोलिस उपनिरिक्षक प्रमोद दिक्षीत म्हणाले, काम करत असताना दहिवडी व पंचक्रोशीतील नागरिकांच्या प्रेमामुळे, सहकार्यामुळे नागरिकांशी जोडली गेली. पुढेही ही आपलेपणाची नाळ पंचक्रोशीतील नागरिकांचे प्रेम असेच राहील.

दरम्यान याच वेळी दहिवडी पोलीस स्टेशनचे नवनिर्वाचित स. पो. नि. संतोष तासगावकर यांचा स्वागत सोहळा पार पडला. यावेळी स. पो. नि. तासगावकर आपले मनोगत मांडताना म्हणाले, कर्तव्याशी निष्ठा ठेवून जबाबदारी पार पाडली जाईल. जनतेला सहकार्य, मदत करण्याची भावना आहे. त्याचबरोबर “कायदा व सुव्यवस्था” अबाधित राखण्यासाठी प्रसंगी कायदेही राबवावे लागतील. “कायद्याचं राज्य राहिल” याचीही ग्वाही त्यांनी या प्रसंगी त्यांनी दिली.

Leave a Comment