हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पोलीस उपनिरीक्षक पदाच्या भरतीमध्ये शारीरिक चाचणीसाठी असलेले १.४ प्रमाण १.६ करावे अशी मागणी स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांनी केली आहे. गेल्या काही वर्षांपासून पोलीस उपनिरीक्षक पदाच्या शारीरिक चाचणीसाठी उपस्थितीचे प्रमाण हे सरासरी ५५% आहे तसेच, ४५% प्रमाण गैरहजरीचे असते. म्हणूनच जे विद्यार्थी ४-५ वर्षांपासून तयारी करत आहेत त्यांना संधी मिळणे आवश्यक आहे. म्हणूनच ज्या प्रमाणे आयोगाने मुख्य परीक्षेचे प्रमाण वाढविले आहे. त्याप्रमाणे शारीरिक चाचणीच्या ठिकाणीही हा विचार करणे गरजेचे आहे असे मत विद्यार्थी व्यक्त करत आहेत.
या परीक्षेला एवढ्या संख्येने उमेदवार गैरहजर राहत असतील तर याला स्पर्धा म्हणता येईल का? अनेकजण ही परीक्षा केवळ सराव म्हणून देतात आणि शारीरिक चाचणीला जात नाहीत. संयुक्त परीक्षेमुळे ज्यांना पोलीस उपनिरीक्षक व्हायचे नाही आहे ते विद्यार्थीही परीक्षा देतात, त्यांना हा अधिकार घटनेनेच दिला आहे. यावर आपण काहीच करू शकत नाही तर पण जर गैरहजरीचे प्रमाण एवढे असेल तर आयोगाने याबाबत विचार करून हे प्रमाण १.४ ऐवजी १.६ करावे अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
हे प्रमाण असे केल्यास आयोगाला योग्य उमेदवार मिळतील असे म्हणत शारीरिक चाचणीला ५० गुण देखील न मिळविणारे ५० पेक्षा अधिक विद्यार्थी आहेत असे काहींनी म्हंटले आहे. दरम्यान आयोगाने सकारात्मक विचार करून निर्णय घ्यावा अशी मागणी होते आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.