कोरोना काळात भासते आहे पैशांची कमतरता, Credit Card द्वारे करा क्रेडिट कार्ड बिल पेमेंट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । देश सध्या कोरोनाव्हायरसच्या दुसर्‍या लाटेशी झुंज देत आहे. कोरोना काळात लोकांना बर्‍याचदा पैशाची कमतरता भासते. अशा परिस्थितीत, आपण आपल्या मित्रांकडून किंवा कुटूंबाकडून पैसे घेता. तुमच्याकडेही जर क्रेडिट कार्ड बिल भरण्यासाठी पैसे नसल्यास घाबरून जाण्याची गरज नाही कारण आज आम्ही तुम्हाला एक असा मार्ग दाखवतो की, तुम्ही क्रेडिट कार्डद्वारेही क्रेडिट कार्डचे (Credit Card) बिल भरू शकाल.

Paytm Wallet बॅलन्समधून क्रेडिट कार्ड बिल पेमेंट देखील केले जाऊ शकते
क्रेडिट कार्ड बिल भरताना सहसा क्रेडिट कार्ड पर्याय उपलब्ध नसतो. परंतु पेटीएमच्या नवीन फीचर्समुळे आपण क्रेडिट कार्डद्वारे आपले क्रेडिट कार्ड बिल देखील भरू शकता. यासाठी तुम्हाला पहिले क्रेडिट कार्डद्वारे आपल्या Paytm Wallet मध्ये पैसे जोडावे लागतील. तथापि, Paytm Wallet मध्ये क्रेडिट कार्डमधून पैसे जोडल्यास, 2.07-3.07 टक्के अतिरिक्त शुल्क भरावे लागते.

>> Paytm अ‍ॅप उघडा आणि All Service वर क्लिक करा

>> यानंतर Monthly Bills वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला Credit Card Bill चा पर्याय दिसेल.

>> जर तुम्हाला पहिल्यांदाच कार्ड भरायचे असेल तर Pay Bill For New Credit Card वर क्लिक करा. यानंतर, कार्ड क्रमांक एंटर करा आणि Proceed वर क्लिक करा.

>> आता पेमेंट मोड निवडा. यानंतर पेटीएम वॉलेट बॅलन्सद्वारे पैसे द्या. खास गोष्ट अशी आहे की, जेव्हा आपण वॉलेट बॅलन्ससह पैसे देता तेव्हा कोणतेही अतिरिक्त शुल्क लागत नाही.

Mobikwik द्वारे क्रेडिट कार्डचा वापर करुन क्रेडिट कार्ड बिल पेंमेंट

>> Mobikwik अ‍ॅप उघडा आणि Recharge & Pay Bills वर क्लिक करा.

>> यानंतर तुम्हाला Credit Card चा पर्याय दिसेल.

>> जर तुम्हाला पहिल्यांदाच कार्ड भरायचे असेल तर Pay Bill For Other Credit Card वर क्लिक करा. यानंतर, कार्ड नंबर एंटर करा आणि रक्कम एंटर करा.

>> आता पेमेंट मोड निवडा. यानंतर, Mobikwik वॉलेट बॅलन्सद्वारे पैसे द्या. तथापि, Mobikwik वॉलेट बॅलन्समधून पेमेंट देण्यासाठी 1.77 टक्के एक्सट्रा चार्ज आकारते. उदाहरणार्थ, वॉलेट / क्रेडिट कार्डसह 1000 रुपयांचे क्रेडिट कार्ड बिल भरण्यासाठी, आपल्यास 1017.70 रुपये द्यावे लागतील.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment