कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी
देशात सद्या अदानीच्या फसवेगिरीची जास्त चर्चा आहे. बँकांना गंडा घालण्यात हा उद्योगपती पुढे आहे. त्याला खतपाणी घालण्यात भाजप कारणीभूत आहे. केंद्रातील सरकारचा आजपर्यंतचा इतिहास बघितला, तर हजारो कोटी रुपये बुडवणाऱ्या लोकांना जपण्याचे काम केल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री व काॅंग्रेसचे जेष्ठ नेते आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
कालवडे (ता. कराड) येथे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून 4 कोटी 50 लाख रुपयांच्या निधीतून साकारल्या जाणाऱ्या विविध विकासकामांच्या शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. जेष्ठ नागरिक भिकू यशवंत थोरात अध्यक्षस्थानी होते. प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस उदयसिंह पाटील- उंडाळकर, कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, प्रदेश काँग्रेसचे सदस्य अजितराव पाटील- चिखलीकर, प्रा. धनाजी काटकर, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस पैलवान नानासाहेब पाटील, कराड दक्षिण सेवादल काँग्रेसचे अध्यक्ष शिवाजीराव मोहिते, नरेंद्र नांगरे- पाटील, काँग्रेसच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, नितीन थोरात, माजी जिल्हा परिषद सदस्य शंकरराव खबाले, सदस्या मंगल गलांडे, माजी पंचायत समिती सदस्य नामदेव पाटील, शरद पोळ, संदीप शिंदे, युवा नेते संताजी थोरात- सावकार, कालवडेचे सरपंच सुदाम मोटे, कासारशिरंबेचे दादासाहेब पाटील, दिग्विजय पाटील, वैभव थोरात, देवदास माने, रेठरे खुर्दच्या सरपंच सुनिता साळुंखे, वाठारचे माजी सरपंच विलास पाटील, संजय तडाखे, ग्रामविकास अधिकारी श्री. देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.
उदयसिंह पाटील म्हणाले, कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात विलासराव पाटील- उंडाळकर यांनी विकासाचा पाया रचला. त्यांनी सुरू केलेल्या विकासाच्या प्रक्रियेस गती देण्याचे काम होताना पाहून आनंद झाला.
गीतांजली थोरात म्हणाल्या, गावच्या पाणीयोजनेबाबत गैरसमज होते. मिळणारे पाणी दूषित असल्याचे शासनाने कळवल्यानंतर पाणीप्रश्न समोर आला. याकामी आम्ही प्रयत्न सुरू केले. उंडाळे प्रादेशिक योजनेतून आमचे गाव वगळले. व पृथ्वीराजबाबांनी पाणीयोजना मिळवून देण्यासाठी मदत केली. याकामी उदयसिंह पाटील यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.
यावेळी भानुदास माळी, प्रा. धनाजी काटकर, मनोहर शिंदे यांची भाषणे झाली. प्रारंभी गितांजली थोरात यांची जिल्हा काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड झालेबद्दल तर वसुंधरा प्रभाग संघ कालेच्या अध्यक्षा शुभांगी थोरात, चिलाईदेवी ग्रामसंघाच्या पदाधिकारी वनिता थोरात, सविता कारंडे, सविता लाळे व सुरेखा थोरात यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संताजी थोरात, सरपंच सुदाम मोटे, ग्रामपंचायत सदस्य दादासाहेब तडाखे, सदस्या भारती गाडे, बाबूराव मोटे, वसंतराव थोरात, दिनकर थोरात, विजय थोरात, संतोष थोरात, गणपती थोरात यांनी स्वागत केले. ग्रामपंचायत सदस्य बालेशराव थोरात यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. सुरेखा थोरात यांनी आभार मानले.
अजितराव पाटील – चिखलीकर यांची फटकेबाजी
अतुल भोसले हे रेठऱ्याच्या पुलास निधी आणला, असा डांगोरा पिटत आहेत. पण पुलाची दुरुस्ती झाली हे ह्यांना माहिती नाही. खरेतर बारसे झालेले ह्या गड्याला माहिती नाही. दुसऱ्याची पोरं आपल्या अंगणात खेळवण्याची प्रवृत्ती विरोधकांची आहे. पृथ्वीराज बाबांनी रेठरे बुद्रुक येथील पुलाची दुरुस्ती केली. नवीन पुलासाठी निधी आणला. कोडोली – पाचवड पुल मंजुरीबरोबर कोयनेचा जुना पुल दुरुस्त केल्याचे महत्व आता पटत आहे. बाबांना निवडून यायचा नाद आहे, आणि अतुल भोसले यांना पडायचा नाद आहे, असे अजितराव पाटील – चिखलीकर यांनी सांगताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.