व्यापाऱ्यांना दिलासा नाहीच; निर्बंध तुर्तास जैसे थे

Unlock
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल होणार अशी घोषणा २-३ दिवसांपूर्वी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली होती. त्या २५ जिल्ह्यांमध्ये औरंगाबादचा देखील समावेश आहे. औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा पॉझिटिव्हीटी रेट कमी असला तरी जोपर्यंत शासनाचे लेखी आदेश येत नाहीत तोपर्यंत निर्बंध शिथिल होण्याची शक्यता नाही, असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले आहे.‌

शासनाच्या २५ जिल्ह्यांच्या यादीत औरंगाबादचे नाव असले तरी मात्र लॉकडाऊन शिथिल करण्याबाबत शासनाकडून काहीही सुचना, आदेश अद्याप प्राप्त झालेला नाही असेही जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले.‌

व्यापाऱ्यांनी लॉकडाऊनचे निर्बंध हटवण्याची मागणी केली असली तरी शासनाकडून काहीही सुचना न आल्यामुळे जिल्ह्यात सध्या तीसऱ्या स्तराचे निर्बंध लागू राहणार आहेत. सोमवारी शासनाकडून काही आदेश आल्यास निर्बंध शिथिल करणे शक्य होईल. दरम्यान शासनाने गुरुवारी राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्याबाबत सुतोवाच केले होते, त्यामुळे औरंगाबाद मध्ये काय सवलती मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.