यंदा दुष्काळाची शक्यता नाही, कसा असेल मान्सून?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : जूनपासून सुरू होणारा नैऋत्य मॉन्सून मध्ये दीर्घ-कालावधी सरासरीच्या (LPA) 103 टक्के सामान्य राहण्याची शक्यता आहे. तसेच यंदा दुष्काळाची शक्यता नसल्याचा अंदाज स्कायमेट ने वर्तवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बाब आहे. अंदाजानुसार जून ते सप्टेंबर या कालावधीत एलपीए चा अंदाज 880.6 मिमी इतका आहे. हा अंदाज खरा ठरल्यास देशात प्रत्यक्षात 907 मिलिमीटर पाऊस राहील.

स्कायमेटनं जाहीर केलेल्या सुरुवातीच्या अंदाजानुसार देशभरात खरंच इतक्याच प्रमाणात पाऊस पडल्यास, पावसाळ्याच्या महिन्यांत सलग तिसर्‍या वर्षी भारतामध्ये सामान्य ते साधारण पाऊस पडेल. 2020 मध्ये देशात एलपीएच्या 109 टक्के पाऊस होता तर 2019 मध्ये हा आकडा 110 टक्के इतका होता. एलपीएच्या 96-104 टक्के पाऊस म्हणजेच साधारण समजला जातो. स्कायमेटने दिलेल्या माहितीनुसार, गेल्यावेळी भारतात 1996 ते 1998 दरम्यान सलग तीन वर्षे सामान्य पावसाळा होता.

स्कायमेटनं असंही म्हटलं आहे, की देशात सरासरी किंवा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता 85 टक्के आहे. तर, सरासरीपेक्षा कमी किंवा व्यापक दुष्काळाची शक्यता 2021 मध्ये नाही.

Leave a Comment