‘तो ड्रामा’ करण्याची कोणतीही आवश्यकता नव्हती, रेमडीसीवीर प्रकरणी सुजय विखेंना न्यायालयाने फटकारले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात रेमडीसीवीरचा तुटवडा असताना भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी आपल्या मतदार संघासाठी दहा हजार रेमडीसीवीर इंजेक्शन आणल्याचा दावा केला जात होता आणि त्याबाबत व्हिडिओ व्हायरल झाल्यानं मोठी खळबळ उडाली होती. मात्र याप्रकरणी आता न्यायालयाने सुजय विखेंना चांगलंच सुनावलं आहे. ‘विखे यांनी रेमडीसीवीर इंजेक्शन विमानातून घेऊन आल्यानंतर व्हिडिओ चित्रित केला हा ड्रामा करण्याची कोणतीही आवश्यकता नव्हती आपण मतदार संघातील खासदार असून दिल्लीत आपले वजन वापरून कशाप्रकारे इंजेक्शन आणलं हे सांगण्याचा दिखाऊपणा होता तो टाळता आला असता’ असे खडे बोल न्यायमूर्तींनी सुनावले आहेत.

राज्यात रेमडीसीवीरचा तुटवडा असताना सुजय विखे यांनी गुपचुप केलेल्या प्रकारामुळे मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर खंडपीठाच्या न्यायाधीशांनी परखड मत व्यक्त करत सुजय विखे याना फटकारून काढले आहे. “तुम्ही जर एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी काम करत असताना बेकायदेशीर मार्गाचा वापर केला तर तो कधीही शुद्ध नसतो” अशा शब्दात न्यायमूर्ती घुगे यांनी सुजय विखे यांची कानउघडणी केली आहे.

दरम्यान सुजय विखे यांनी कोणतेही गुन्हेगारीचे काम केले नाही रेमडीसीवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला होता. लोकांची मदत करण्यासाठी त्यांनी विमानानं जाऊन इंजेक्शनचा साठा आणला होता आणि तो लोकांमध्ये वाटला होता. हा गुन्हा ठरू शकत नाही असा युक्तिवाद सुजय विखे यांच्या वकिलांनी केला होता. अशी माहिती एका वृत्तवाहिनीने दिली आहे.

 

Leave a Comment