Ladaki Bahin Yojana: सध्या राज्यांमध्ये लाडकी बहिण योजनेचे वारे वाहत आहेत. मात्र हीच योजना विरोधकांच्या टीकेचे कारण बनली आहे. या योजनेबाबत सत्ताधाऱ्यांवर आरोप करण्यात येत आहेत. तसेच, ही योजना बंद होणार असल्याची चर्चा देखील सुरू आहे. या सर्व पार्श्वभूमीवरच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी योजनेबद्दल विधानसभेत स्पष्ट भूमिका मांडली आहे.
सोमवारी सभागृहात बोलताना अजित पवार म्हणाले की, “लाडकी बहीण योजनेसंदर्भात (Ladaki Bahin Yojana) काहीही गैरसमज पसरवले जात आहेत. आम्ही ही योजना बंद करणार नाही. उलट, तिच्यात काही आवश्यक दुरुस्त्या करून अधिक प्रभावी करू.” यावेळी त्यांनी विरोधकांनाही टोला लगावत “लाडकी बहीण आमची झाली आहे, त्यामुळे तुम्ही दोडके झाला आहात,” असे देखील वक्तव्य केले आहे.
त्याचबरोबर, अजित पवार यांनी या योजनेच्या आर्थिक बाजूवरही भाष्य करत म्हणले की , “महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी लाडकी बहीण योजना (Ladaki Bahin Yojana)केवळ मदतीपुरती मर्यादित राहणार नाही. महिलांना उद्योजकतेस चालना देण्यासाठी आम्ही त्यासोबत कर्ज योजनाही आणणार आहोत,” या वक्तव्यामुळे आता सरकार आणखीन नवीन योजना आणणार असल्याचे म्हणले जात आहे.
महत्वाचे म्हणजे मुंबई बँकेने जाहीर केले आहे की, लाडकी बहीण योजनेच्या खातेदार महिलांना १० ते २५ हजार रुपये कर्ज उपलब्ध करून दिले जाईल. याशिवाय, जिल्हा सहकारी बँका, सहकारी बँका आणि महिला आर्थिक विकास महामंडळास देखील अशा कर्ज योजना राबवण्याचे आवाहन अर्थमंत्र्यांनी केले आहे. याबाबत बोलताना, “लहान-मोठा व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या महिलांना आर्थिक पाठबळ मिळेल आणि महिलांच्या हातात वर्षाला जवळपास ४५,००० कोटी रुपये येणार आहेत,” असे अजित पवार यांनी नमूद केले.
दरम्यान, सध्याच्या घडीला विरोधकांकडून लाडकी बहिण योजनेवर (Ladaki Bahin Yojana)टीका केली जात आहे. तसेच सरकार राज्यातील महिलांची फसवणूक करत असल्याचा गंभीर आरोप विरोधकांकडून केला जात आहे. महत्त्वाचे म्हणजे, आता या योजनेमुळे सरकारची तिजोरी रिकामी होत चालली आहे. परिणामी राज्य सरकार इत्यादी योजना बंद करण्याचा विचार करत आहे.