महायुतीत फूट? आगामी निवडणूक एकनाथ शिंदे स्वबळावर लढण्याच्या तयारीत

mahayuti
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महायुती सरकारने जोरदार तयारी सुरू केली आहे. मात्र आता महानगरपालिका निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेने स्वबळावर लढण्याचा निर्धार केला आहे. म्हणजेच यंदाची महापालिका निवडणूक एकनाथ शिंदे स्वातंत्र लढण्यात इच्छुक आहेत. त्यामुळेच महायुतीत फूट पडली असल्याच्या चर्चांना जोर आला आहे.

सध्या मुंबई आणि ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि शिंदे गटाच्या मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत बोलताना नीलम गोऱ्हे यांनी सांगितले की, “महापालिका निवडणुकीत मैत्रीपूर्ण लढत होईल. तथापि, पुणे महापालिका, मुंबई, ठाणे वगळता उर्वरित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्र येईल”

दरम्यान, स्थानीय स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीला सकारात्मक वातावरण असल्याचे देखील गोऱ्हे यांनी म्हणले. त्यामुळे आता आगामी निवडणुका कशा पद्धतीने पार पडतील याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. महत्त्वाचे म्हणजे, अद्याप कोणताही प्रमुख पक्षांनी निवडणुकीबाबत भूमिका स्पष्ट केलेली नाही.