पुणेकरांना दिलासा! २३ जुलैनंतर लॉकडाउन नसेल जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांची माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे । पुण्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरात १० दिवसांसाठी लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. हा लॉकडाऊन आणखी काही दिवस वाढणार असल्याची चर्चा होत असताना २३ जुलैनंतर पुणे जिल्ह्यात लॉकडाउन नसेल, अशी सूचक माहिती जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दिली आहे. त्यामुळे पुणेकरांना दिलासा मिळणार आहे.

सोमवारी प्रसार माध्यमांशी बोलताना जिल्हाधिकारी राम म्हणाले, कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता १० दिवसांचा लॉकडाउन जाहीर करण्यात आला. या काळात नागरिकांनी प्रशासनाला चांगले सहकार्य केले. त्यामुळे या लॉकडाउननंतर पुन्हा लॉकडाउन असणार नाही. मात्र, या पुढील काळात देखील आजपर्यंत शासनाने दिलेल्या आदेशाचे पालन नागरिकांना करावे लागणार आहे असं नवलकिशोर राम यांनी म्हटलं.

पुणे शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यापासून आजपर्यत प्रशासनाकडून रुग्ण संख्या नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने विशेष उपाय योजना करण्यात येत आहेत. तर त्याच दरम्यान तपासण्या देखील वाढविण्यात आल्या आहेत. त्यामुळे दररोज रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्ण संख्या जरी वाढत असली, तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये. पुढे येऊन उपचार घ्यावेत. कोणत्याही रुग्णाला बेड कमी पडू देणार नाही. तसेच सध्याची परिस्थिती लक्षात घेता, शहरी भाग आणि त्यानंतर ग्रामीण भागातील रुग्णाची संख्या नियंत्रणात येण्यास मदत होईल असा अंदाज जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी व्यक्त केला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment