मावळ विधानसभा : भाजपच्या बाळा भेगडेंच्या उमेदवारीला बंडाळीचे ग्रहण ; भाजपच्या सुनील शेळकेना राष्ट्रवादीची उमेदवारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी | भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा पुणे जिल्ह्यातील मावळ विधानसभा मतदारसंघ बंडखोरीच्या कृत्याने चर्चेत येणार आहे. भाजपच्या दुसऱ्या यादीत बाळा भेगडे यांना उमेदवारी नाकारली जाण्याची शक्यता असतानाच भाजपने त्यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भाजपचे सुनील शेळके राष्ट्रवादीत गेले आहेत. त्यांना राष्ट्रवादीने उमेदवारी देखील जाहीर केली आहे.

भाजपने या आधी मावळ विधानसभा मतदारसंघातून एका व्यक्तीला फक्त दोन वेळा उमेदवारी देण्याची परंपरा पाळली आहे. परंतु हि परंपरा मोडीत काढत भाजपने बाळा भेगडे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. याचाच संताप मनात धरून नाराज सुनील शेळके अपक्ष उमेदवारी दाखल करण्याच्या तयारीत आहेत. बाळा भेगडे यांनी माघार घेऊन पक्षाच्या संघटनात्मक कामात मदत करावी असा मानस या मतदारसंघातून दोन वेळा आमदार राहिलेल्या दिगंबर भेगडे यांनी बोलून दाखवला होता. मात्र बाळा भेगडे यांनी राजकीय महत्वकांक्षा ठेवून तिकिटासाठी मुख्यमंत्र्यांकडून सेटिंग केल्याची मतदारसंघात चर्चा आहे.

या मतदारसंघात येणाऱ्या तळेगाव दाभाडे आणि त्या गावाच्या आजूबाजूच्या परिसरात गुन्हेगारीने उच्छाद माजवला आहे. या गुन्हेगारीला आमदार बाळा भेगडे खतपाणी खतपाणी घालत असल्याचा त्यांच्यावर नेहमी आरोप होत. तर याच गुन्हेगारीला खलाशी बुडवण्यासाठी आपल्याला या भागाचा आमदार व्हायचं आहे असा मानस सुनील शेळके यांनी वेळोवेळी बोलून दाखवला आहे. त्यांनी उमेदवारीसाठी मागील अनेक दोन तीन वर्षांपासून मतदारसंघात चांगली कामे केली आहेत. तसेच दांडगा जनसंपर्क निर्माण केला आहे. त्यामुळे सुनील शेळके विधानसभा निवडणुकीत भाजप सोबत कडवी झुंज खेळणार हे निश्चित आहे.

Leave a Comment