पुणे- बंगलोर महामार्गावरील ‘हे’ दोन उड्डाणपूल होणार जमीनदोस्त : काय आहे प्रशासनाचा प्लॅन ते पहा

Karad Kolhapur Naka
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी 
पुणे- बंगलोर महामार्गावरील दोन उड्डाणपूल जमीनदोस्त करण्यात येणार आहेत. कराड शहराजवळील कोल्हापूर नाका आणि कृष्णा हाॅस्पीटलसमोर असलेले उड्डाणपूल पाडण्याची पूर्वतयारी संबधित कंपनीकडून सुरू आहे. एक नव्हे तर दोन उड्डाणपूल पाडण्याचा प्लॅन ठरला असून यासाठीच मुहूर्त अद्याप ठरलेला नाही. परंतु येत्या 15 ते 20 दिवसात पूल पाडण्याच्या कामास सुरूवात होणार आहे. त्यासाठी तांत्रिक मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.

कराड शहराचे प्रवेशद्वार असलेल्या कोल्हापूर नाका येथे वाहतूक कोंडीला प्रवासी व वाहन चालकांना सामोरे जावे लागत आहे. पुणे- बंगलोर महामार्गावरील कराड व मलकापूर शहराच्या हद्दीतील एक नव्हे तर दोन उड्डाणपूल पाडण्यात येणार आहेत. पूल पाडण्यासाठीची सदर कंपनीची पूर्वतयारी सुरू आहे. कोल्हापूर नाका येथील उड्डाणपूल पाडण्यासाठीचा प्रस्तावर पोलिसांना देण्यात आला आहे. त्यावर वाहतूक पोलिस व जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख हे निर्णय घेणार आहेत. वाहतूकीची कोंडी होवू नये, यासाठी योग्य ती उपाययोजना झाल्यानंतर उड्डाणपूल पाडण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र अद्याप पूल कोणत्या दिवशी पाडण्यात येणार याबाबत निर्णय झालेला नाही.

15 ते 20 दिवसात पूल पाडण्यास सुरूवात
कराड शहरात प्रवेश करण्यासाठी कोल्हापूर नाक्यावर उड्डाणपूल आहे. त्या उड्डाणपूलाखालून शहरात सर्व वाहने ये- जा करतात. परंतु कोयना पूल ते नांदलापूर गावच्या हद्दीतील यशवंत फर्निचर ठिकाणापर्यंत 3.2 किमीचा उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. त्यामुळे या दरम्यान असलेले दोन्ही पूल पाडण्यात येणार आहेत. त्यासाठी सर्व प्लॅन रेडी झाला असून तो मंजुरीसाठी पोलिस व प्रशासनाकडे पाठविण्यात आला आहे. त्यामुळे पुढील 15 ते 20 दिवसात पूल पाडण्यास सुरूवात होईल. उड्डाणपूल टप्याटप्याने पाडण्यात येणार आहे. तसेच किमान 7 दिवस तरी पूल पाडण्यात येणार नसल्याचे संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्ग कोणता?
पुणे- बंगलोर महामार्गावर कराड शहरातील कोल्हापूर नाक्यावरील उड्डाण पूल पाडण्याचे काम सुरु झाले आहे. जुना पूल पाडून नवीन उड्डाण पूल बांधण्यात येणार असून महामार्गावरील कामामुळे वाहतूक कोंडी होत आहे. मागील काही दिवसांपासून शहरातील नागरिकांसोबतच पुणे बंगलोर महामार्गाने प्रवास करणारे प्रवाशीसुद्धा या वाहतूक कोंडीमुळे त्रस्त झाले आहेत. त्यामुळे हि वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. महामार्गाचे काम सुरु असताना वाहतुकीकरता कोणता पर्यायी मार्ग वापरावा याबाबत प्रशासन लवकरच सविस्तर माहिती देणार आहे. सध्या कराड शहरातील नागरिक मलकापूर ते मार्केटयार्ड या रस्त्याचा वापर करून वाहतूक कोंडीपासून सुटका मिळवत आहेत.