म्हणुन मुख्यमंत्री ठाकरे लवकरच करणार नाशिक दौरा – छगन भुजबळ

मुंबई | जगभरात कोरोनाचे संकट हे दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोनावर लस शोधण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ आटोकाट प्रयत्न करत आहेत. शहरासह ग्रामीण भागात करोनाबाधितांची संख्या झपाटय़ाने वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे दोन ते तीन दिवसात वैद्यकीय तज्ज्ञांच्या टीमसोबत नाशिक जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. करोनाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री प्रथमच मुंबईबाहेर पडणार आहेत. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दूरध्वनीच्या माध्यमातून पालिका आयुक्तांशी चर्चा केली होती. आता खुद्द मुख्यमंत्री स्वतः नाशिकची स्थिती जाणून घेणार आहेत.

पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकारांशी संवाद साधत मुख्यमंत्र्यांच्या नाशिक दौऱ्याची माहिती दिली. शुक्रवारी दुपारी भुजबळ यांच्या उपस्थितीत पालिकेतील अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली. महाराष्ट्राच्या तुलनेत नाशिकमध्ये मृत्यूदर कमी असून तो आणखी कमी करण्याची गरज आहे. आरोग्य, जिल्हा, महापालिका प्रशासन, पोलीस आदी विभागांशी या मुद्यांवर चर्चा करण्यात आली. रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असून खाटा, व्हेंटिलेटर, प्राणवायु पुरविणारी व्यवस्था आदींचे नियोजन करण्यात येत आहे. अवश्य असणाऱ्या सर्व सोयी सुविधांचा आढावा घेतला गेला. करोनामुळे एकही मृत्यू होता कामा नये. जिल्ह्य़ात मृत्यूदर कमी असला तरी,रुग्णसंख्या वाढत असल्याबद्दल आपण अजिबात समाधानी नाही असे, तसेच रुग्णांना उपलब्ध खाटांची माहिती वेळेवर मिळत नाही. त्यामुळे मुंबईप्रमाणे नाशिकमधील रुग्णालयांनी संपर्क अधिकारी नेमावेत, असे छगन भुजबळ यांनी स्पष्ट बैठकीला विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोर्जे, पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह आदी उपस्थित होते.

अनेक शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा लॉक डाउन ची मागणी होत आहे. काही अंशा ती गरजेचंही आहे. काही समाज घटकांनी स्वयंस्फुर्तीने एकत्र येत टाळेबंदी केली. परंतु, त्यातून काही हाती लागले नाही. जितक्या प्रमाणात कोरोना नियंत्रित व्हायला हवा तेवढा झाला नाही. टाळेबंदीच्या विरोधात आपली भूमिका नाही. परंतु नेहमी लॉक डाउन पण शक्य नाही. सर्व समाज घटकांना सोबत घेऊनच काम करण्यावर सरकारचा भर आहे. लॉक-डाउन चा जो काही निर्णय असेल तो मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून घेतला जाईल, असे भुजबळ यांनी सांगितले.काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील काही भागांचा दौरा केला होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.