भारताची ‘ही’ 12 शहरे 2100 पर्यंत पाण्याखाली जाणार, NASA च्या रिपोर्टमध्ये दावा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वॉशिंग्टन ।अमेरिकन अंतराळ संस्था नासाने भारताबाबत धक्कादायक रिपोर्ट दिला आहे. या रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, आजपासून 80 वर्षांनंतर म्हणजेच 2100 पर्यंत भारतातील 12 शहरे 3 फूट पाण्यात बुडतील. या रिपोर्ट नुसार, मैदानी भागात प्रचंड नाश होईल. हे सर्व ग्लोबल वॉर्मिंगमुळे ध्रुवांवर गोठलेले बर्फ वितळल्यामुळे होईल.

अमेरिकन स्पेस एजन्सी नासाच्या रिपोर्ट नुसार, जागतिक तापमानवाढीच्या ओखा, मोरमुगाओ, भावनगर, मुंबई, मंगलोर, चेन्नई, विशाखापट्टणम, तुतीकोरन, कोची, पारादीप आणि पश्चिम बंगालच्या किद्रोपोर किनारपट्टीवरील भागावर बर्फ वितळल्याचा परिणाम अधिक दिसून येईल. अशा परिस्थितीत, किनारपट्टी भागात राहणाऱ्या लोकांना भविष्यात सुरक्षित ठिकाणी जावे लागेल.

या रिपोर्टमध्ये म्हटले गेले आहे की, पश्चिम बंगालचा किद्रोपोर परिसर, जिथे गेल्या वर्षीपर्यंत समुद्र पातळी वाढण्याचा धोका नाही. तिथेही 2100 सालापर्यंत अर्धा फूट पाणी वाढेल.

नासाने समुद्रसपाटीचे प्रोजेक्शन टूल तयार केले
वास्तविक, नासाने समुद्र पातळीवरील प्रोजेक्शन टूल तयार केले आहे. यामुळे लोकांना वेळेत बाहेर काढण्यात आणि समुद्रकिनाऱ्यावरील आपत्तीपासून आवश्यक व्यवस्था करण्यात मदत होईल. या ऑनलाईन प्रोजेक्शन टूल द्वारे कोणीही भविष्यातील आपत्ती म्हणजेच समुद्राची वाढती पातळी जाणून घेऊ शकेल.

इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज (IPCC) च्या रिपोर्टचा हवाला देत नासाने अनेक शहरे समुद्रात बुडण्याचा इशारा दिला आहे. IPCC चा हा सहावा एसेसमेंट रिपोर्ट आहे, जो 9 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झाला.

मैदानी प्रदेशात नाश होईल
नासाच्या या रिपोर्टमध्ये म्हटले गेले आहे की,”वर्ष 2100 पर्यंत जगाचे तापमान लक्षणीय वाढेल. लोकांना भयंकर उष्णता सहन करावी लागेल. जर कार्बन उत्सर्जन आणि प्रदूषण थांबवले नाही तर तापमान सरासरी 4.4 डिग्री सेल्सियसने वाढेल. पुढील दोन दशकात तापमानात 1.5 अंश सेल्सिअसने वाढ होईल. जर या वेगाने पारा वाढला तर हिमनद्याही वितळतील. त्यांचे पाणी मैदानी आणि समुद्री भागात विनाश आणेल.

अनेक देशांचे क्षेत्र कमी होईल
त्याच वेळी, नासा प्रशासक बिल नेल्सन म्हणाले की,”पुढच्या शतकापर्यंत आपल्या अनेक देशांची जमीन कमी होईल हे जागतिक नेत्यांना आणि शास्त्रज्ञांना सांगण्यासाठी समुद्र पातळी प्रोजेक्शन टूल पुरेसे आहे. समुद्राची पातळी इतक्या वेगाने वाढेल की, हाताळणे कठीण होईल. याची उदाहरणे सर्वांसमोर आहेत. अनेक बेटे बुडाली आहेत. इतर अनेक बेटे समुद्र गिळतील.

Leave a Comment