व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

BoI आणि सेंट्रल बँकेसह या 4 बँकांचे लवकरच होणार खासगीकरण! सरकारची काय योजना आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । केंद्र सरकार (Modi Government) लवकरच आणखी 4 बँकांचे खासगीकरण (Bank privatisation) करू शकते. लाइव्हमिंटच्या वृत्तानुसार, खासगीकरणाच्या पुढील टप्प्यासाठी सरकारने 4 मध्यम-आकाराच्या राज्य बॅंकांची निवड केली असून लवकरच त्यांचे खासगीकरण होऊ शकते. सूत्रांच्या माहितीनुसार बँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra), बँक ऑफ इंडिया (BoI), इंडियन ओव्हरसीज बँक आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank) यांची नावे या यादीत समाविष्ट झाली आहेत.

सरकारची योजना काय आहे ते जाणून घ्या
सरकारी बँका विकून सरकारला महसूल मिळवायचा आहे जेणेकरुन हे पैसे सरकारी योजनांवर वापरता येतील. सरकार मोठ्या प्रमाणावर खासगीकरण करण्याची योजना आखत आहे. सध्या बँकिंग क्षेत्रात सरकारचा मोठा वाटा आहे, ज्यामध्ये हजारो कर्मचारी काम करतात. बँकांचे खासगीकरण करणे हे एक धोकादायक काम आहे, यामुळे काम करणाऱ्या कर्मचार्‍यांवरही याचा परिणाम होऊ शकतो.

अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात घोषणा केली
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनीही आपल्या केंद्रीय अर्थसंकल्प 2021 च्या भाषणात जाहीर केले होते की,”केंद्र सरकार यावेळी निर्गुंतवणुकीवर अधिक भर देत असल्याने सार्वजनिक क्षेत्रातील दोन बँक आणि एक सामान्य विमा कंपनीचे खासगीकरण करण्यात येईल. त्याद्वारे भारत पेट्रोलियममधील निर्गुंतवणुकीचे (Disinvestment) नियोजन केले जात आहे.”

केवळ 5 सरकारी बँकाच शिल्लक राहतील
यावेळी केंद्र सरकार देशातील निम्म्याहून अधिक पीएसयू बँकांचे (PSU Banks) खाजगीकरण (Privatization) करण्याचा विचार करीत आहे. सर्व काही योजनेनुसार झाले तर, आगामी काळात देशात फक्त 5 सरकारी बँका राहतील.

गेल्या तीन वर्षांत बँकिंग क्षेत्रात विलीनीकरण आणि खासगीकरणांमुळे राज्य सरकारी बँकांची संख्या 27 वरून 12 करण्यात आली असून, आता ती मर्यादित करण्याचे ठरवित आहे. यासाठी नीति आयोग ने ब्लू प्रिंटही तयार केल्या आहेत.

विद्यमान सरकारी बँक
>> स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)
>> सेंट्रल बँक ऑफ इंडिया
>> बँक ऑफ इंडिया
>> बँक ऑफ महाराष्ट्र
>> युको बँक
>> पंजाब आणि सिंध बँक
>> इंडियन ओव्हरसीज बँक
>> बँक ऑफ बडोदा + देना बँक + विजया बँक
>> पंजाब नॅशनल बँक + ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स + युनायटेड बँक
>> कॅनरा बँक + सिंडिकेट बँक
>> युनियन बँक ऑफ इंडिया + आंध्र बँक + कॉर्पोरेशन बँक
>> अलाहाबाद बँक + इंडियन बँक

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.