हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या पृथ्वीचा अंत होणार आहे. असे आजपर्यंत आपण कित्येक वेळा ऐकलेले आहे. एवढंच काय !अगदी जगाचा अंत होणार आहे, याची तारीख देखील समोर आलेली आहे. आणि अनेक लोकांनी त्याची वाट देखील पाहिली आहे. परंतु अजून तरी तसे काही चित्र दिसलेले नाही. परंतु अनेकांना हा प्रश्न पडतो की, या जगाचा अंत होणार आहे तर नक्की कसा होणार आहे?आणि याला नक्की कोणती कारणे आहेत? आता या गोष्टीला अनेक कारण आहेत. आणि त्यातीलच एक महत्त्वाचे कारण म्हणजे हवामानात सातत्याने होणारा बदल.
आपल्या जगात जर पाहिले तर अनेक शहरे ही समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेली आहेत. जेव्हा हवामान बदल होतो. तेव्हा समुद्राच्या पाण्याची पातळी वाढते. अगदीच स्तूनामीची देखील शक्यता असते. यांचा परिणाम या समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेल्या शहरांना होऊ शकतो. एवढेच काहीतरी शहरे पूर्णपणे नष्ट होतील. असा अंदाज देखील वर्तवण्यात आलेला आहे. आता याच हवामान बदलाच्या कारणांमुळे 2030 पर्यंत जगातील जवळपास पाच शहरे पूर्णपणे नाहीशी होतील. असे देखील सांगण्यात आलेले आहे. तसेच नकाशावरून देखील या शहरांचे नाव हटवले जाणार असल्याची चर्चा चालू आहे. आता नक्की ही कोणती पाच शहरे आहेत? हे आपण जाणून घेऊया.
नेदरलँड, ॲमस्टर्डम
ॲमस्टर्डम हे शहर विविधतेने नटलेले आहे. हे एक ऐतिहासिक शहर आहे याच ठिकाणी अनेक कालवे आहेत. तसेच ऐतिहासिक आकर्षणासाठी हे एक प्रसिद्ध ठिकाण मानले जाते. या शहराला एक मोठा समुद्रकिनारा लाभलेला आहे. आणि हे शहर अगदी समुद्राच्या काठावर आहे. त्यामुळे समुद्राच्या पाण्याची पातळी वाढली, तर या शहराच्या अस्तित्व धोक्यात येऊ शकते. तसेच नेदरलँड मध्ये ही अनेक धरणे आहेत. जर या धरणाच्या सातत्याने पाणी पातळीमध्ये वाढ झाला, तर या ठिकाणची जमीन वेगाने बुडू शकते. अशी माहिती समोर आलेली आहे.
न्यू ऑर्लियंस यूएसए
न्यू ऑर्लियंस हे शहर या नदीच्या काठावर आहे. हे शहर म्हणजे अमेरिकन संस्कृतीच्या एक प्रतीक मानले जाते. परंतु अगदी पाण्याच्या किनाऱ्यावर असलेल्या या शहराला भविष्यात जाऊन धोका निर्माण होऊ शकतो. कारण या समुद्राचे पातळी सातत्याने वाढत असते. त्यामुळे हे शहर पूर्णपणे बुडून जाण्याचे संकेत दिसत आहेत. या ठिकाणी प्रतिबंधक भिंती देखील बांधलेल्या आहेत. परंतु या भिंती कमकुवत झाल्यानंतर मात्र या शहराला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होऊ शकतो.
होची मिनी सिटी व्हिएतनाम
हे शहर देखील समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले आहे. त्यामुळे समुद्राच्या पाण्याची पातळी वाढली, तर या शहराला एक खूप मोठ्या संकटाचा सामना करावा लागू शकतो. या शहराच्या पूर्वेकडील जिल्ह्यांना पुराचा खूप मोठा धोका आहे. परंतु या शहरांच्या संरक्षणासाठी प्रशासनाकडून कोणतेही प्रयत्न केलेले दिसत नाही. त्यामुळे 2030 पर्यंत हे शहर बुडण्याची शक्यता अभ्यासकांकडून वर्तवली गेलेली आहे
वेनिस शहर इटली
इटलीमधील हे वेनिस शहर अत्यंत सुंदर असे शहर आहे. पर्यटनासाठी हे शहर खूप प्रसिद्ध आहे. या ठिकाणांचे सौंदर्य पाहून अनेक लोक या ठिकाणी भेट देतात. परंतु सध्या या शहराच्या जवळ समुद्राची पाण्याची पातळी वाढत आहे. तसेच हवामान विभाग देखील सातत्याने या शहराला पुराचा धोका वर्तवत आहे. जर भविष्यात या शहराला वादळी वारा आणि समुद्राच्या मोठ्या पातळीचा सामना करावा लागला, तर या शहराचा नाश होण्याची शक्यता आहे.
बँकॉक थायलंड
बँकॉक थायलंड या शहराची राजधानी आहे. परंतु या थायलंडच्या अस्तित्व देखील संपुष्टात येण्याची भीती वर्तवण्यात आलेली आहे. समुद्राच्या पाण्याची पातळी वाढल्यावर या ठिकाणची जमीन बुडू शकण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तसेच बँकॉकचा काही भाग सध्या पाण्याखालीच आहे.