1 जानेवारीपासून बदलणार हे 5 नियम; खिशाला बसणार कात्री

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2024 हे वर्ष येत्या पाच ते सहा दिवसात संपणार असून , त्यानंतर 2025 या नववर्षाची सुरुवात होणार आहे. या सुरु होणाऱ्या वर्षात अनेक महत्त्वाचे आर्थिक आणि धोरणात्मक बदल लागू केले जाणार आहेत. म्हणजेच 1 जानेवारी 2025 पासून वेगवेगळ्या क्षेत्रातील होणाऱ्या बदलाचा परिणाम थेट सर्वसामान्यांच्या खिशावर होताना दिसणार आहे. तर हे बदल कोणते आहेत , आणि त्याचा परिणाम लोकांवर कसा होईल हे आज आपण पाहणार आहोत . तर चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

Amazon Prime मध्ये बदल –

Amazon Prime या प्लॅटफॉर्मचा वापर करणाऱ्याची संख्या प्रचंड असून , हि बातमी त्यांच्यासाठी महत्वाची ठरणार आहे. Amazon India ने प्राइम मेंबरशिपच्या अटींमध्ये बदल केले आहेत. नवीन नियमांनुसार, प्राइम व्हिडिओ आता एका खात्यातून केवळ दोन टीव्हीवरच स्ट्रीम होऊ शकतो. यापेक्षा जास्त टीव्हीवर स्ट्रीम करण्यासाठी अतिरिक्त सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे लोकांना त्याचा तोटा होऊ शकतो.

GST पोर्टलवर तीन महत्त्वाचे बदल –

GST हा जीवनाचा एक अविभाज भाग बनला असून, आता GST पोर्टलवर तीन महत्त्वाचे बदल होणार आहेत. ई-वे बिलाच्या मर्यादा आणि व्हॅलिडिटीत सुधारणा करण्यात येणार आहे. तसेच पोर्टलवर सुरक्षिततेसाठी नवीन नियम लागू होणार आहेत, ज्याचा खरेदीदार, विक्रेता आणि वाहतूकदार यांच्यावर परिणाम होताना दिसणार आहे.

RBI च्या FD धोरणातील बदल –

आपले सर्व व्यवहार बँकांनाच्या माध्यमातून चालत असतात. त्यामुळे हि माहिती तुमच्यासाठी महत्वाची ठरणार आहे. रिझर्व्ह बँकेने NBFC आणि HFC यांच्यासाठी मुदत ठेवीच्या धोरणांमध्ये बदल जाहीर केला आहे. ठेवींच्या विम्यासह, ठेवींच्या व्याजदरांवरही याचा परिणाम होऊ शकतो. हे बदल नववर्षाच्या पहिल्या तारखेपासून करण्यात येणार आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांवर त्याचा परिणाम दिसून येऊ शकतो.

कार आणि एलपीजी दरात बदल –

मारुती सुझुकी, महिंद्रा, मर्सिडीज, बीएमडब्ल्यू यांसारख्या कंपन्या 3% किमती वाढवणार आहेत. तसेच यासोबत एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीतही बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांसोबत इतर लोकांवरही याचा परिमाण दिसून येणार आहे.

दूरसंचार कंपनीचे नवीन नियम –

या सर्व बदलासोबतच दूरसंचार कंपन्या नवीन नियम लागू करणार आहेत. त्यासाठी कंपन्यांना अधिकाधिक ऑप्टिकल फायबर आणि मोबाइल टॉवर बसवण्यावर भर दिला आहे. या धोरणामुळे नेटवर्क सुधारणा होईल आणि ग्राहकांना अधिक चांगली सेवा मिळेल.