‘या’ कारणांमुळे मासिक पाळी वेळेवर येत नाही; इतके दिवस पिरिअड न येणे सामान्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मासिक पाळी ही महिलांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. परंतु आज काल जीवनशैली मोठ्या प्रमाणात बदललेली आहे. बाहेर तळलेले पदार्थ खाणे तसेच इतर चुकीच्या वाईट सवयींमुळे आजकाल मासिक पाळीमध्ये (Periods) अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहेत. अनेक महिलांच्या मासिक पाळीमध्ये अनियमितता आलेली आहे. परंतु मासिक पाळी योग्य वेळेत न येण्याची अनेक कारण आहेत. जर मासिक पाळी नियमित न येण्याची कारणे कोणती आहेत? तुम्ही किती मासिक पाळी न येणे सामान्य गोष्ट आहे. हे आज आपण जाणून घेणार आहोत.

पीसीओएसची कारणे

आरोग्य तज्ञांच्या मते वेळेवर मासिक पाळी न येणे पीसीओएस किंवा पीसीओडी हे देखील कारण असू शकते. अनेक वेळा पीसीओएस किंवा पीसीओडीएस मुळे महिलांच्या मासिक पाळीत अनियमितता येते. यावेळी या महिलांचे ओफ्युलेशन होत नाही. त्यांच्या शरीरातील एस्ट्रोजेनची पातळी देखील वाढते. त्यामुळे त्यांच्या मासिक पाळीत अनियमितता येते.

ताणतणाव वाढणे

मासिक पाळी रेग्युलर न येण्याचे सगळ्यात मुख्य कारण म्हणजे ताणतणाव. ज्या महिलांना ताणतणाव असतो. त्यांचे हार्मोनल संतुलन बिघडते. अशावेळी त्यांची मासिक पलीपाळी उशिरा येते. किंवा काही महिने येत देखील नाही. परंतु अशा वेळी त्यांना इतर अनेक समस्यांना देखील सामोरे जावे लागते.

लठ्ठपणा

आजकाल बदलत्या जीवनशैली मुळे लठ्ठपणा वाढत चालला आहे. आणि हे मासिक पाळी न येण्याचे एक मुख्य कारण आहे. ज्या महिलांचे वजन जास्त आहे. त्यांच्या शरीरात इस्ट्रोजनची पातळी जास्त होते. आणि याचा परिणाम त्यांच्या मानसिक तसेच शारीरिक आरोग्यावर होतो. त्याचप्रमाणे त्यांना इतर अनेक समस्यांना देखील सामोरे जावे लागते.

प्रमाणापेक्षा जास्त वजन कमी होते

वजन अतिशय कमी असणे हे देखील मासिक पाळी नियमित न येण्याचे एक कारण आहे. तुमचे वजन जर अचानक जास्त कमी झाले, तरी देखील तुमच्या शरीरातील हार्मोनल संतुलन बिघडते. अशावेळी तुम्हाला नियमित मासिक पाळी येत नाही.

गर्भनिरोधक औषधे घेणे

अनेक महिला या गर्भधारणा टाळण्यासाठी गर्भनिरोधक गोळ्यांचे सेवन करतात. परंतु या गोळ्यांचा महिलांच्या शरीरावर विपरीत परिणाम होतो. या गोळ्यांचे सातत्याने सेवन केल्याने मासिक पाळी येण्यास अडचण निर्माण होते. तसेच शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होतो.

21 ते 30 दिवसांची मासिक सायकल असणे अगदी सामान्य गोष्ट आहे. पण जर 6 आठवडे किंवा त्यापेक्षा जास्त दिवस मासिक पाळी तुम्हाला आली नाही, तर ती मात्र गंभीर गोष्ट आहे. अशावेळी तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन योग्य तपासणी करून घेतली पाहिजे. आणि त्यानुसार तुमच्या जीवनशैलीत बदल केला पाहिजे.