हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आज-काल डोके दुखणे हा आजार सामान्य झालेला आहे. दर दोन व्यक्तींना डोके दुखण्याचा त्रास होत असतो थकवा, सर्दी बदलते हवामान या सगळ्यामुळे देखील डोके दुखत असतात. परंतु काही काही लोकांना डोक्याची तीव्र वेदना चालू होते. आणि ते लोक औषध घेतात. परंतु जर तुमचे प्रमाणापेक्षा जास्त डोके दुखत असेल, किंवा सारखेच डोके दुखत असेल, तर त्याकडे फक्त मेडिकलमधील गोळ्या खाऊन अजिबात दुर्लक्ष करू नका. कारण कधी कधी डोके दुखणे हे मेंदूच्या ट्यूमरचे संकेत असू शकते. जर एखाद्या व्यक्तीला वारंवार डोके दुखत असेल, तर त्यांनी डॉक्टरांनी संपर्क साधने खूप गरजेचे आहे.
सामान्य डोकेदुखी आणि ट्यूमरच्या डोकेदुखीमध्ये खूप फरक आहे. सामान्य डोके दुखत दुखत असेल, तर चिंता करण्याची गरज नाही. परंतु जर वेगळ्या प्रकारे डोके दुखत असेल तर ट्यूमर असण्याची शक्यता असते. त्यामुळे डोके दुखण्यात कोणते फरक असतात. हे समजून घेणे खूप गरजेचे असते. मेंदूमध्ये ट्यूमर असल्यास डोक्याचे दुखणे अचानक तीव्र होते. शरीराला झटका आल्यासारखे होते. तसेच डोकेदुखी ही सामान्य दुखण्यापेक्षा जास्त वेळ राहते. तसेच डोक्याला काहीतरी धडक लागल्यासारखे वाटते. काही वेळा डोके जड होते. तुम्हाला जर अशी काही लक्षण दिसत असेल, तर अजिबात त्याकडे दुर्लक्ष करू नका.
जर तुम्हाला देखील थंडर हेडॅक वाटत असेल याचा अर्थ तुमच्या डोक्यातील रक्तवाहिनी फुटली आहे. आणि रक्त बाहेर पडत आहे. अशा वेळी तो व्यक्ती दीर्घकाळ अपंग होण्याची शक्यता असते. तसेच कोमामध्ये जाऊन मृत्यू देखील होण्याची शक्यता असते. कधी कधी अंतर्गत रक्तस्त्राव झाल्यामुळे देखील डोकेदुखी होऊ शकते. यावेळी पक्षपात होण्याचा देखील धोका असतो. त्यामुळे गळ्यातून जात असलेल्या रक्तवाहिन्या अचानक बंद होतात. आणि मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो. अशावेळी माणसाचा मृत्यू होण्याची देखील शक्यता असते. जर तुम्हाला प्रमाणापेक्षा जास्त डोके दुखत असेल, तर तुम्ही वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा आणि तपासणी करून घ्या.