हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्या देशभरामध्ये रिलायन्स जिओचे ग्राहक वाढत चालले आहेत. अशातच आता या ग्राहकांसाठी जिओने JioHotstar प्लॅटफॉर्म लाँच केला आहे. रिलायन्स जिओचे JioCinema आणि Disney+ Hotstar या ओटीटी प्लॅटफॉर्म्ससह विलीनीकरण आहे. या विलीनीकरणामुळे ग्राहकांना दोन्ही प्लॅटफॉर्मवरील कंटेंट एकाच ठिकाणी पाहता येणार आहे. आता जिओने JioHotstar लाँच करून ग्राहकांच्या मनोरंजनात वाढ केली आहे.
महत्वाचे म्हणजे, सुरुवातीला JioHotstar सर्व वापरकर्त्यांसाठी मोफत उपलब्ध असणार आहे. परंतु, प्रीमियम कंटेंट आणि जाहिरात-मुक्त अनुभवासाठी, वापरकर्त्यांना सबस्क्रिप्शन घ्यावे लागणार आहे. यामुळेच JioHotstar ने तीन प्रमुख सबस्क्रिप्शन प्लॅन सादर केले आहेत. हे प्लॅन्स पुढीलप्रमाणे आहेत.
- मोबाईल प्लॅन: या प्लॅनमध्ये 720p (HD) गुणवत्तेचे कंटेंट उपलब्ध आहे. वापरकर्ते फक्त एका मोबाईल डिव्हाइसवर हा प्लॅन वापरू शकतात. 3 महिन्यांसाठी किंमत 149 रुपये, तर वार्षिक सबस्क्रिप्शनसाठी 499 रुपये आहे. या प्लॅनमध्ये जाहिराती दाखवल्या जातील.
- सुपर प्लॅन: या प्लॅनमध्ये 1080p (फुल HD) गुणवत्तेचे कंटेंट उपलब्ध आहे. वापरकर्ते कोणत्याही दोन डिव्हाइसवर (मोबाईल, टीव्ही किंवा वेब) हा प्लॅन वापरू शकतात. 3 महिन्यांसाठी किंमत 299 रुपये, तर वार्षिक सबस्क्रिप्शनसाठी 899 रुपये आहे. या प्लॅनमध्येही जाहिराती दाखवल्या जातील.
- प्रीमियम प्लॅन: या प्लॅनमध्ये 4K (2160p) + डॉल्बी व्हिजन सपोर्टसह उच्च गुणवत्तेचे कंटेंट उपलब्ध आहे. वापरकर्ते एकाच वेळी चार डिव्हाइसवर हा प्लॅन वापरू शकतात. मासिक सबस्क्रिप्शनची किंमत 299 रुपये, तर वार्षिक सबस्क्रिप्शनसाठी 1499 रुपये आहे. या प्लॅनमध्ये जाहिराती नसतील, मात्र लाईव्ह स्पोर्ट्स दरम्यान जाहिराती दिसू शकतात.
दरम्यान, JioHotstar हे विलीनीकरण भारतीय ओटीटी बाजारात मोठा बदल घडवणारे ठरणार आहे. कारण, प्रेक्षकांना एका प्लॅटफॉर्मवर JioCinema आणि Disney+ Hotstar वरील लोकप्रिय चित्रपट, वेब सिरीज, क्रीडा कार्यक्रम आणि अन्य मनोरंजन पाहता येईल. तसेच, IPL, FIFA, क्रिकेट वर्ल्ड कप यासारख्या मोठ्या स्पर्धांचे थेट प्रक्षेपण या प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे.




