माजी कर्णधार मायकेल क्लार्कने केलेले आरोप कसोटी कर्णधार टिम पेन याने फेटाळले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयपीएल लिलावामध्ये खेळाडूंना मिळणाऱ्या पैशांवर नजर ठेवून विराट कोहलीला खूश करण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्स त्याच्याशी पंगा घेण्याचे टाळतात, हे माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार मायकेल क्लार्कने केलेले आरोप कसोटी कर्णधार टिम पेन याने फेटाळून लावले आहेत.भारतीय कर्णधाराची बॅट शांत राखण्यासाठीची ही एक रणनीती असल्याचे पेन याने स्पष्ट केले.

‘‘विराट किंवा अन्य भारतीय खेळाडूंविरोधात खेळताना ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्सचे वागणे बदलल्याचे मला कधीच जाणवले नाही.भारताविरोधात खेळणे कधीच सोपे नसते.त्यातही भारतीय कर्णधार विराट कोहलीविरुद्ध खेळणे कोणालाही सोपे जात नाही.त्यातच विराट खेळत असताना जर त्याला डिवचवल्यास तो आणखीनच त्वेषाने फलंदाजी करतो,’’ असे पेनने सांगितले.

भारतीय संघ येत्या ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियाच्या प्रदीर्घ दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासंदर्भात पेन म्हणाला, ‘‘ऑस्ट्रेलियन खेळाडू भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत सर्वस्व पणाला लावून खेळतील.देशासाठी खेळताना ‘आयपीएल’चा करार कुणाच्याही डोक्यात नसतो,’’ असे पेन याने स्पष्ट केले.

Tim Paine not focusing on Ashes yet ahead of Test Championship ...

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

या बातम्याही वाचा –

Leave a Comment