Saturday, March 25, 2023

ठाकरे सरकार दाऊदच्या इशाऱ्यावर चालतय ; या भाजपा नेत्याचा खळबळजनक आरोप

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | उत्तर प्रदेशमधील भाजपाचे आमदार नंदकिशोर गुर्जर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना एक पत्र लिहिलं आहे. तसंच आपल्याला डी कंपनीद्वारे जीवे मारण्याची धमकी मिळत असल्याचंही त्यांनी पत्रात नमूद केलं आहे. यावेळी त्यांनी महाराष्ट्र सरकारवरही गंभीर आरोप करत सरकार डी कंपनीच्या इशाऱ्यावर चालत असल्याचं म्हटलं. तसंच ते सरकार तात्काळ बर्खास्त करून राष्ट्रपती शासन लावण्याची मागणीही त्यांनी केली.

- Advertisement -

“महाराष्ट्रातील सरकार डी कंपनीच्या इशाऱ्यावर चालत आहे. ते सरकार तात्काळ बर्खास्त करून राष्ट्रपती शासन लागू करण्याक यावं. महाराष्ट्रात महाविनाश आघाडीचं सरकार सत्तेवर आलं आहे. तेव्हापासून महाराष्ट्र अपराध आणि ड्रग्जमध्ये आलाय. उद्धव ठाकरे एक डमी मुख्यमंत्री म्हणून काम करत आहे. परंतु खरा मुख्यमंत्री तर दाऊद इब्राहिम आहे. याची पडताळणी करण्यासाठी आवश्यकता असल्यास लोकांचे कॉल डिटेल्स काढण्यात यावे,” असंही गुर्जर म्हणाले. दरम्यान, यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अटकेची मागणीही केली. तसंच कंगना रणौतला बॉलिवूड माफियांकडून जिवाचा धोका असल्यामुळे तिच्यासाठी झेड प्लस सुरक्षा उपलब्ध करून द्यावी अस गुर्जर यांनी नमूद केलं.

महाराष्ट्रातील ठाकरे सरकार राष्ट्रविरोधी शक्ती आणि कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमच्या प्रभावाखाली असंवैधानिक आणि लोकशाही विरोधी काम करत आहे. यामुळे चित्रपट माफिया, नेपोटिझ्म आणि गुन्हेगारी क्षेत्राची एकी झाली आहे. महाराष्ट्र सरकार यात सहभागी होऊन सुशांतसारख्या युवकांची हत्या करत देश पोखरत आहे. आता त्यांना कंगनाची हत्या करायची आहे. कंगनानं त्यांचा खरा चेहरा सर्वांसमोर आणला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’