हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| पावसाळ्यात पर्यटकांसाठी विविध पर्यटन स्थळे खुली करण्यात येतात. परंतु सध्या याच पर्यटन स्थळांवरून धक्कादायक घटना समोर येत आहेत. त्यामुळेच येत्या ३१ जुलैपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. तसेच, पुणे जिल्ह्यातील काही पर्यटन स्थळे बंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. तसेच इतर ठिकाणी देखील विविध नियम लागू झाले आहेत. या नियमांचे पालन केल्यास पर्यटकांवर कठोर कारवाई केली जाईल.
याठिकाणी बंदीचे आदेश
वरसगाव धरण, सिंहगड, गडकिल्ले परिसर, आंबेगाव भिमाशंकर, डिंभे धरण परिसर, कोंडवळ धबधबा, माळशेज घाट, शिवनेरी, माणिकडोह, भाटघर धरण, चासकमान धरण, भोरगिरी घाट येथे बंदीचे आदेश लागू आहेत.
हे धबधबे आणि धरणे बंद
कोल्हापूर मधील धबधब्यांकडे जाणारा मार्ग बंद ठेवण्यात आला आहे. तसेच, शाहूवाडी परिसरातील धबधबे आणि धरणाजवळ पर्यटनाला बंदी घालण्यात आली आहे. तसेच शाहुवाडी येथील धबधबे आणि पर्यटन स्थळांवर कलम 144 लागू करण्यात आले आहे. तर बरकी, केर्ले ऊखलू धबधब्याकडे जाणारे मार्ग बंद ठेवले आहेत.
अजिंठा फोटो आणि रील काढण्यास बंदी
अजिंठा लेणीतील सप्तकुंड धबधबा परिसरात फोटो किंवा रील काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच लेणीवर देखील फोटो, रील, व्हिडिओ बनवणाऱ्यांसाठी बंदी घातली आहे. कारण की याठिकाणी निसर्गाचे सौंदर्य पाहून व्हिडिओ फोटो काढण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे पर्यटक जोखीम पत्करून धोक्याची ठिकाणी जात आहेत.
ठाण्यातील ही ठिकाणे बंद
कोंडेश्वर धबधबा, भोज, दहिवली, आंबेशिव नदी, चंदेरी गड, चांदप, आस्नोली नदी, बारवी नदी, कल्याण तालुक्यातल्या कांबा, पावशेपाडा, खडवली नदी, टिटवाळा नदी, गणेश घाट, मुरबाड तालुक्यातील सिद्धगड, डोंगरन्हावे, सोनाळे, हरिश्चंद्रगड, अशोक धबधबा, आजा पर्वत, सापगाव नदी किनारा, कळंबे नदी, कसारा घाट अशा विविध पर्यटन स्थळी जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.