2024 म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी ठरला सुवर्णकाळ; मिळवला जबरदस्त नफा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या फार वाढली आहे. जे यामध्ये गुंतवणूक करत आहेत त्यांच्यासाठी 2025 वर्ष सुवर्णमय ठरणार आहे. म्युच्युअल फंड इंडस्ट्रीचे एसेट अंडर मॅनेजमेंट (AUM) नोव्हेंबरच्या शेवटी 39 % वाढून ते 68 लाख कोटी रुपयांवर पोहचलेले आहे. भविष्यातही या फंडामध्ये गुंतवणूक वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. हि वाढ होण्यामागे काही कारणे आहेत, त्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची भक्कमता आणि कंपन्यांच्या कमाईत होणारी वाढ ही महत्त्वाची कारणे असल्याचे सांगण्यात आले आहे.

गुतंवणूकदारांना जबरदस्त नफा देणार फंड –

2024 मध्ये काही फंडांनी गुतंवणूकदारांना जबरदस्त नफा मिळवून दिला आहे. त्यामध्ये Motilal Oswal Midcap Fund, LIC MF Infra Fund, Motilal Oswal ELSS Tax Saver Fund, Bandhan Small Cap Fund आणि Motilal Oswal Small Cap Fund यांचा समावेश असल्याचे दिसून येत आहे.

किती टक्के परतावा –

LIC MF Infra Fund ने यावर्षी आतापर्यंत 52.4 टक्के नफा मिळवून दिला आहे. तसेच Motilal Oswal ELSS Tax Saver Fund ने 50 टक्के, तर Bandhan Small Cap Fund ने 48.9 टक्के परतावा दिला आहे. त्यासोबत Motilal Oswal Small Cap Fund चा परतावा 48.3 टक्के आहे . तसेच हायब्रिड फंडांमध्येही 2024 मध्ये चांगला नफा कमवून दिला आहे. या फंडांचे एयूएम 8.77 लाख कोटी रुपयांवर पोहोचले असून, यामध्ये एका वर्षात 41 टक्क्यांची वाढ झाली आहे. हायब्रिड फंड म्हणजे इक्विटी आणि डेट या दोन्हीमध्ये गुंतवणूक करणारे फंड होय . अ‍ॅग्रेसिव्ह हायब्रिड फंडांचे सरासरी परतावा 19.8 टक्के, बॅलन्स्ड अ‍ॅडव्हांटेज फंडांचे परतावा 15.2 टक्के, तर मल्टी अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशनचा परतावा 17.3 टक्के होता.

2024 मध्ये मोठया प्रमाणात गुंतवणूक –

2024 मध्ये बॉण्ड फंडांमध्येही मोठया प्रमाणात गुंतवणूक होताना दिसत आहे. या कॅटेगरीचे एयूएम 16.86 लाख कोटी रुपयांवर पोहोचले. यामध्ये एका वर्षात 24 टक्के वाढ झाली आहे. तसेच लाँग ड्युरेशन फंडांचा सरासरी नफा 11.6 टक्के, डायनॅमिक बॉण्ड कॅटेगरीचा परतावा 9.1 टक्के, तर शॉर्ट आणि मिड टर्म कॅटेगरीचा परतावा 8.8 टक्के होता.

गुंतवणूकदारांची SIP च्या प्रति लोकप्रियता –

2024 मध्ये SIP (सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) च्या माध्यमातून छोट्या रकमेने गुंतवणूक करणे सोपे झाले. शेअर बाजाराची सुधारलेली स्थिती आणि भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीमुळे पुढील काळातही गुंतवणूकदारांचा कल म्युच्युअल फंडांकडे वाढेल असा अंदाज व्यक्त होत आहे.