जूनपासून राज्यांतील ‘या’ मुलींना मिळणार मोफत शिक्षण; चंद्रकांत पाटलांची घोषणा

Free Education
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नुकतीच राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मुलींच्या शिक्षणासंदर्भात एक मोठी घोषणा केली आहे. येत्या जून महिन्यापासून राज्यातील ज्या मुलींच्या पालकांचे आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे त्या सर्व मुलींना 600 अभ्यासक्रमाचे शिक्षण मोफत (Free Education) देण्यात येणार आहे. त्यामुळे या मुलींना शिक्षण घेत असताना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागणार नाही. चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या या घोषणेनंतर राज्यातील कित्येक मुलींना मोठा दिलासा मिळाला आहे.

या मुलींना मिळणार मोफत शिक्षण

शुक्रवारी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठांमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्येच बोलताना चंद्रकांत पाटील यांनी ही घोषणा केली आहे. सध्या वाढत्या शिक्षण दरामुळे पालकांचे लाखो रुपये खर्च होतात. मेडिकलसाठी तर करोडो रुपये भरावे लागतात. यामुळे कित्येक सर्वसामान्य कुटुंबातील मुली पुढे शिकू शकत नाही. तसेच त्यांचे डॉक्टर ,इंजिनिअर बनण्याचे स्वप्न देखील अर्धवटच राहते. अशा मुलींसाठीच सरकारने शिक्षणाची दारे उघडली आहेत.

चंद्रकांत पाटील यांनी आपल्या घोषणेमध्ये म्हटले आहे की, सध्या राज्यामध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलींमध्ये ज्या मुलींच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी आहे, अशा मुलींना डॉक्टर, इंजिनियरबरोबर 600 अभ्यासक्रमामध्ये मोफत शिक्षण देण्यात येईल. यामुळे कोणत्याही मुलीचे आर्थिक अडचणीमुळे शिक्षण अपूर्ण राहणार नाही. तसेच राज्यातील मुलींच्या शिक्षणाचा दर्जा उंचावेल. राज्यातील मुली या प्रगतीपथावर जाते.

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या या घोषणेनंतर मुलांमध्ये नाराजी दिसून आल्याचे समोर आले आहे. हा कार्यक्रम संपल्यानंतर काही मुलांनी चंद्रकांत पाटील यांची भेट घेत त्यांना मागणी केली की, मुलींना मोफत शिक्षण का द्यावे? ज्या मुलांच्या पालकांचे उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी आहे त्या मुलांना देखील मोफत शिक्षण देण्यात यावे. त्यामुळे आता मुलांच्या या मागणीबद्दल सरकार काय निर्णय घेईल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.