भारतातील ३००० हॉटेल्सनी चीनी नागरिकांसाठी दरवाजे केले बंद 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या जवानांच्या चकमकीत २० भारतीय जवान शहीद झाले होते. त्यामुळे भारतामध्ये चीनी उत्पादने वापरण्यावर बंदी घालण्यासाठीचे आंदोलन उदयाला येते आहे. सर्वच भारतीयांच्या मनात चीनविषयी तीव्र भावना निर्माण झाल्या आहेत. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी Boycott Chinese Product अशी मोहिम राबवली आहे. यासोबतच महाराष्ट्रानेही चीनी कंपन्यांसोबतचा ५००० कोटींचा करार ही मोडला असल्याची माहिती समोर आली होती. आता भारतातील ३००० हॉटेल्सनी चीनी नागरिकांसाठी आपले दरवाजे बंद केले असल्याची माहिती समोर आली आहे. 

राजधानी दिल्लीत ‘कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’कडून चिनी वस्तुंच्या बहिष्काराचं समर्थन करण्यात आले आहे. त्यासोबतच  या संघटनेकडून दिल्लीतील ३००० बजेट हॉटेल आणि गेस्ट हाऊसमध्ये यापुढे चिनी नागरिकांना राहण्याची परवानगी दिली जाणार नाही. असे जाहीर करण्यात आले आहे.  या हॉटेल आणि गेस्ट हाऊसचे जवळपास ७५ हजार खोल्या आहेत. गुरुवारी बजेट हॉटेल्सच्या संघटना असलेल्या ‘दिल्ली हॉटेल अँड गेस्ट हाऊस ओनर्स असोसिएशन’ने या निर्णयाची घोषणा केली आहे.

चीनच्या दररोजच्या अरेरावीपणाला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं यावेळी सांगण्यात आले. तसेच चीन भारतासोबत ज्या पद्धतीनं व्यवहार करत आहे आणि ज्या पद्धतीनं सीमेवर भारतीय सैनिकांची चिनी सैनिकांकडून निर्घृण हत्या करण्यात आली, त्यानंतर दिल्लीच्या सर्व हॉटेल व्यावसायिकांच्या मनात चीनबद्दल मोठा राग आहे, असं ‘दिल्ली हॉटेल असोसिएशन’चे अध्यक्ष संदीप खंडेलवाल यांनी म्हटले आहे. चीन म्हणजे जग नाही, त्यांच्या वस्तूशिवाय आपणही जगू शकतो, आम्ही कायद्याचे पालन करणारे नागरिक आहोत असेही त्यांनी यावेळी सांगितले. काही तपास यंत्रणांनी जाणीवपूर्वक चीनने भारतावर हल्ला केल्याची माहिती दिली होती.

Leave a Comment