Budget 2024 : यंदाच्या अर्थसंकल्पात ‘हे’ मुद्दे राहतील केंद्रस्थानी!! निर्मला सीतारामन यांनी दिली मोठी माहिती

Budget 2024
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| येथे 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यामुळे निर्मला सीतारामन या सहाव्यांदा अर्थसंकल्प मांडणाऱ्या दुसऱ्या अर्थमंत्री असणार आहेत. मुख्य म्हणजे लोकसभा निवडणुका जवळ आल्या असताना सरकार नेमके कोणते निर्णय घेईल? तसेच अर्थसंकल्पामध्ये कोणत्या मुद्द्यांवर जास्त भर देण्यात येईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच अर्थमंत्री निर्मला सीतारामण एक मोठे वक्तव्यं केले आहे.

25 जानेवारी रोजी हिंदू कॉलेजमध्ये नॉर्थ ब्लॉकमध्ये हलवा समारंभ पार पडला. या कार्यक्रमात बोलताना, “जात, धर्म किंवा समुदायाचा भेदभाव न करता लोकांच्या विकासावर भर दिला जाईल, असं मोदी म्हणाले होते. युवक, महिला, शेतकरी आणि गरिबांच्या विकासाबाबत त्यांनी भूमिका मांडली होती, त्यामुळे सरकारचे लक्ष युवक, महिला, आम्हाला अन्न सुरक्षा देणारे, आमचे शेतकरी आणि गरीब यांच्या विकासावर असेल” असे निर्मला सीताराम यांनी म्हटले.

कोणते मुद्दे केंद्रस्थानी राहतील? (Budget 2024)

त्याचबरोबर, “कोणत्याही धर्म किंवा जातीचा भेदभाव न करता त्यांच्या विकासावर आणि उन्नतीवर सरकारचे लक्ष असेल. तसेच कौशल्य विकास, शेतीची साधने तसेच नागरिकांना चांगली आरोग्य सेवा देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे” अशी माहिती देखील त्यांनी दिली. महत्त्वाची बाब म्हणजे, यावेळी बोलताना निर्मला सीतारामन यांनी युवक, महिला, शेतकरी आणि गरिब वर्ग या मुद्द्यांवर जास्त भर दिल्याने अर्थसंकल्पामध्ये (Budget 2024) देखील हे मुद्दे केंद्रस्थानी राहतील, असा अंदाज बांधला जात आहे.

दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प (Budget 2024) सादर करणार आहेत. मोदी सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प असणार आहे. कारण, येत्या एप्रिल-मे महिन्यात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. यानंतर केंद्रात स्थापन होणारे नवीन सरकार 2024-25 या आर्थिक वर्षाचा पूर्ण अर्थसंकल्प सादर करतील. परंतु पुन्हा मोदी सरकार निवडून आल्यानंतर अर्थसंकल्प सादर करण्याची जबाबदारी मोदी सरकारवर येईल.