कोरोनाच्या ‘Breakthrough Infection’ मधील लोकांमध्ये दिसून येत आहेत ‘ही’ लक्षणे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । कोरोना लसीचे एक किंवा दोन डोस घेतल्यानंतरही भारतात संसर्गाची प्रकरणे समोर येत आहेत. अशा परिस्थितीत, लस घेऊनही होणाऱ्या संसर्गाच्या बाबतीतही तज्ञांमध्ये चिंता आहे. नुकतेच इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) केलेल्या अभ्यासात असे समोर आले आहे की, कोरोनाच्या ब्रेकथ्रू इन्फेक्शनच्या (Breakthrough Infection) या प्रकरणांमध्ये काही प्रमुख लक्षणे आढळली आहेत.

ICMR च्या या अभ्यासात देशातील बहुतेक सर्व राज्यांमधील 677 जणांचा समावेश होता. या दरम्यान हे उघडकीस आले की, यातील फक्त 9.8 टक्के लोकांनाच रुग्णालयात दाखल करावे लागले तर बाकीचे घरीच बरे झाले आहेत. तथापि, या वेळी या लोकांना आरोग्याशी संबंधित काही मुख्य आजारांना सामोरे जावे लागले, ज्याची माहिती या अभ्यासात दिली आहे.

या अभ्यासामध्ये असे सांगितले गेले आहे की, ब्रेकथ्रू इन्फेक्शनने ग्रस्त लोकांमध्ये सर्वाधिक ताप दिसून आला आहे. कोरोना संक्रमित 69 टक्के लोकांना ताप (Fever) आला. त्याच वेळी, 56 टक्के लोकांना अंग दुखी, डोकेदुखीसह (Headache), मळमळण्याचा Nausea) त्रास देखील झाला होता. तर 45 टक्के रुग्णांनी खोकल्याची तक्रार केली. यासह, 37 टक्के लोकांना घसा दुखण्याची समस्या जाणवली.

या दरम्यान, 22 टक्के लोकांनी चव आणि वासाची संवेदना गमावली. अतिसार (Diarrhoea) झाल्याची नोंद फक्त सहा टक्के लोकांनी केली. केवळ सहा टक्के लोकांना श्वास घेण्यात अडचण (Breathlessness) वाटली. या व्यतिरिक्त, 1% लोकं अशी होती ज्यांना डोळ्यांमध्ये जळजळीला सामोरे जावे लागले.

तज्ञांच्या मते, ही सर्व कोरोनाची सामान्य लक्षणे आहेत जी कोरोनाच्या पहिल्या लाटे दरम्यान लोकांमध्ये दिसली. मात्र दुसर्‍या लाटेमध्ये जन्मलेल्या कोरोनाची गंभीर स्थिती असलेल्यांपैकी श्वास घेण्यात अडचण येण्यासारखी लक्षणे केवळ सहा टक्के लोकांमध्येच आढळली आहेत. अशा परिस्थितीत, हे निश्चित आहे की, लस घेतल्यानंतरही कोरोनामध्ये ब्रेकथ्रू इन्फेक्शन होणे शक्य आहे, परंतु त्याचा परिणाम गंभीर होत नाही. त्याच वेळी, त्याची लक्षणे देखील सामान्य राहतात.

या अभ्यासानुसार पुढे असेही म्हटले गेले आहे की,” देशातील वेगवेगळ्या राज्यात कोरोनाच्या ब्रेकथ्रू इन्फेक्शनसाठी वेगवेगळ्या कोरोनाचे व्हेरिएंट जबाबदार आहेत. कुठेतरी डेल्टा (Delta) किंवा कप्पा (Kappa) किंवा अल्फा व्हेरिएंट (Alpha Variant) मुळे लोकं ब्रेकथ्रूच्या संसर्गाच्या जाळ्यात आले आहेत. तथापि, यापैकी केवळ 0.4 टक्के लोकांचाच मृत्यू झाल्याने दिलासा मिळाला आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment