Wednesday, June 7, 2023

… म्हणून हे लोक कुत्र्यांना रंगवून बनावत आहेत ‘वाघ’

विशेष प्रतिनिधी । कर्नाटकातील शिवमोग्गा जिल्ह्यात लोक कुत्र्यांना रंगाचे पट्टे मारून ‘वाघ’ बनवत आहेत. कुत्र्यांच्या शरीरावर काळ्या आणि पिवळ्या रंगाच्या पेंटने पट्या बनविल्या जातात, जेणेकरून ते वाघांसारखे दिसतात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि लोक असे का करीत आहेत ? तर मग जाणं घेऊयात हे लोक असे का करत आहेत .

तर यामागे सर्वात मोठे कारण म्हणजे माकड. होय, लोक वानर टाळण्यासाठी अशा युक्त्या घेऊन आले आहेत. शिवमोग्गा जिल्ह्यातील नल्लूर गावात लोकांनी त्यांच्या पाळीव कुत्र्यांना वाघांसारखे दिसण्यासाठी रंगविले आहे. ज्या दिवशी माकडं त्यांच्या पिकांना नुकसान करतात, त्यापासून वाचण्यासाठी लोकांनी कुत्री रंगविली आहेत.

या गावातील लोक प्रामुख्याने कॉफी आणि सुपारीची लागवड करतात. सुरुवातीला त्यांनी माकडांना तेथून काढून टाकण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या पण ते सर्व अयशस्वी ठरले, त्यानंतर त्यांनी कुत्र्यांना रंगविण्याचा निर्णय घेतला.

पूर्वी माकडे पिके उधळत असत. आता खेड्यातील प्रत्येकजण ही कल्पना अवलंबवत आहे. आणि कुत्र्यांना वाघांसारखे बनवित आहे.