हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अनेक लोकांना फिरायला जाण्याची इच्छा असते. त्यामुळे ते अनेक ठिकाणी फिरत असतात. परंतु सगळ्या गोष्टींचा विचार करता, त्यांना परदेशातील अनेक ठिकाणांना भेट देता येत नाही. म्हणूनच त्यांच्या अनेक इच्छा अपूर्ण राहतात. परंतु आता तुमच्या या सगळ्या इच्छा पूर्ण होणार आहेत. कारण आपल्या भारतात सध्या अशी काही पर्यटन स्थळे तयार झाली आहेत, जी विदेशातील पर्यटन स्थळांना देखील मागे टाकतील. आज आपण अशी काही ठिकाणी पाहणार आहोत की, विदेशातील तुम्ही भारतामध्ये फिरू शकता.
श्रीनगर मधील ट्युलिप गार्डन म्हणजेच एम्स येथील ट्युलिप फेस्टिवल
एम्स्टरडर येथील ट्यूलिप फेस्टिवल हा संपूर्ण जगामध्ये खूप प्रसिद्ध आहे. या ठिकाणी अनेक लोक भेट देत असतात. परंतु या ठिकाणी जाण्यासाठी तुमचे आर्थिक बजेट देखील तेवढे लागते. परंतु यावेळी ऐवजी तुम्ही श्रीनगरमध्ये जाऊन याचा अनुभव घेऊ शकता.आशिया खंडातील सर्वात मोठे ट्युलिप गार्डन या ठिकाणच्या जबरवन पर्वतराजा मध्ये आहे. श्रीनगरमधील प्रसिद्ध असलेल्या या दल सरोवर कडे हे गार्डन आहे. तसेच या बागेत 60 जाती आणि विविध रंगाच्या 15 लाखां पेक्षा जास्त ट्युलिप्स पाहायला मिळतात. मार्च महिन्यासाठी हे गार्डन खुले होते.
स्विझर्लंड ऐवजी गुलमर्ग
स्विझर्लंड हे जगातील सुंदर असे ठिकाण आहे. या ठिकाणी अनेक पर्यटक भेट देत असतात. परंतु आता तुम्ही भारतातच अगदी कमी पैशांमध्ये स्वीझरलँडचे दर्शन घेऊ शकता. तुम्ही स्विझरलँड ऐवजी काश्मीर मधील गुलमर्गला भेट देऊ शकता. या ठिकाणी तुम्हाला बर्फाच्छादित पर्वतांचे दृश्य पाहून पाहायला मिळेल, असे म्हटले जाते काश्मीरमधील गुलमर्ग सर्वाधिक पाहिले जाणारे एक पर्यटन स्थळ आहे.
इंग्लंडच्या लेक डिस्ट्रिक्ट ऐवजी नैनीताल
भारतातील उत्तराखंड राज्यातील कुमाऊ या भागामध्ये नैनीताल हे एक हिल स्टेशन आहे. या ठिकाणी अनेक लोक भेट देत असतात. याला तलावाचे शहर असे देखील म्हटले जाते. या ठिकाणचा हा तलाव इंग्लंडच्या लेक डिस्ट्रिक्ट सारखाच दिसतो. तुम्हाला जर इंग्लंडचे हे तलाव पाहायची इच्छा असेल, तर तुम्ही त्या ऐवजी नैनितालला जाऊ शकता.
अमेरिकेतील अँटीलोप व्हॅलीपेक्षा उत्तराखंडमधील व्हॅली ऑफ फ्लॉवर्स
अमेरिकेतील अँटीलोप व्हॅलीमध्ये जगातील सर्वात सुंदर फुले या ठिकाणी आहेत. त्यामुळे अनेक लोक या ठिकाणी भेट देत असतात. परंतु तुम्हाला जर अमेरिकेला जाणे शक्य नसेल, तर त्याऐवजी तुम्ही उत्तराखंड राज्यातील अँटीलोप व्हॅली ऑफ फ्लावर्सला भेट देऊ शकता. हे एक उंचावर असलेले कुरण आहे. मार्च ते नोव्हेंबर या कालावधीत 100 पेक्षा जास्त प्रकारची फुले तुम्हाला या ठिकाणी दिसतील.