कोविड -१९ चा सामना करण्यासाठी ‘या’ राज्यांना पंतप्रधान केअर्स फंडकडून मिळणार ५० हजार व्हेंटिलेटर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पीएम केअर्स फंड ट्रस्टने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील कोविड रुग्णालयांना मेड इन इंडिया व्हेंटिलेटर पुरवण्यासाठी 2 हजार कोटी रुपयांचे वाटप केले आहे. पंतप्रधान कार्यालयाने मंगळवारी सांगितले की, प्रवासी कामगारांच्या कल्याणासाठीही यावेळी एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या 50 हजार व्हेंटिलेटरपैकी 30 हजार व्हेंटिलेटर भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या सरकारी कंपनीतर्फे तयार केले जात आहेत. तर उर्वरित 20 हजार व्हेंटिलेटर हे अग्वा हेल्थकेअर आणि 10 हजार एएमटीझेड बेसिक हे बनवित आहेत. आतापर्यंत 2,923 व्हेंटिलेटर तयार केले गेले आहेत, त्यापैकी 1,340 व्हेंटिलेटर हे राज्यांना पुरविण्यात आलेले आहेत.

या राज्यांना व्हेंटिलेटर मिळतील
व्हेंटिलेटर मिळणार्‍या प्रमुख राज्यांमध्ये महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, बिहार, कर्नाटक आणि राजस्थान यांचा समावेश आहे. जून 2020 अखेर सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना अतिरिक्त 14,000 व्हेंटिलेटरचा पुरवठा केला जाईल. याशिवाय परप्रांतीय कामगारांच्या कल्याणासाठीही एक हजार कोटींची रक्कम यापूर्वीच राज्यांना देण्यात आलेली आहे. ही मदत परप्रांतीयांचा निवारा, जेवण, वैद्यकीय उपचार आणि वाहतुकीच्या व्यवस्थेसाठी वापरली जाणार आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, गुजरात, दिल्ली, पश्चिम बंगाल, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान आणि कर्नाटक हे या रकमेला प्राप्त करणारे प्रमुख राज्ये आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment