हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल आणि नवनवीन आजार उदयास येत आहे. अशातच कर्करोग (Cancer) हा एक अत्यंत जीवघेणा आजार आहे. यावर अगदी 100 टक्के इलाज होईलच याची देखील खात्री नाही. परंतु आपण जर पाहिले, तर आजकाल कर्करोगाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. हा कर्करोग शरीराच्या एखाद्या भागापासून सुरू होऊन संपूर्ण शरीरात देखील पसरू शकतो. आणि त्यावेळी आपल्याला त्यावर प्रतिबंध करणे कठीण जाते. परंतु अनेकांना प्रश्न पडतो की, हा कर्करग नक्की कशामुळे होतो? तर यासाठी अनेक कारणं आहेत. यामध्ये तुमची असलेली जीवनशैली, (Lifestyle) जंक फूड, प्रक्रिया केलेले फूड, प्लास्टिकचा वापर, कमी हालचाली, तणाव, कॉस्मेटिक वापर धूम्रपान इत्यादी अनेक गोष्टींचा यामध्ये समावेश असतो. आणि या चुकीच्या गोष्टींचा आपण अवलंब केला, तर आपल्या शरीरात कॅन्सरच्या पेशी तयार होतात. आता आपण जाणून घेऊया खास करून असे कोणते घटक आहेत ज्यामुळे आपल्याला कॅन्सरचा धोका वाढतो.
प्लास्टिक
प्लॅस्टिकमध्ये असलेले बीपीए, मायक्रोप्लास्टिक, बिस्फेनॉल, फॅथलेट यांसारखे पदार्थ कर्करोगाला आमंत्रण देतात. हे सर्व अंतःस्रावी व्यत्यय आणणारी रसायने मानले जातात, जे शरीरातील हार्मोन्समध्ये व्यत्यय आणतात आणि स्तनाच्या कर्करोगासारख्या कर्करोगाचा धोका वाढवतात. त्याऐवजी काच निवडा आणि प्लास्टिकची भांडी किंवा प्लास्टिकच्या बाटल्या वापरू नका. अन्न प्लास्टिकमध्ये पॅक करू नका आणि डिस्पोजेबल प्लास्टिकची भांडी वापरू नका.
कीटकनाशक
कीटकनाशकांसह काम करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये प्रोस्टेट कर्करोगाचा धोका वाढतो आणि त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या महिलांमध्ये गर्भाशयाच्या आणि मूत्राशयाच्या कर्करोगाचा धोका वाढतो. कीटकनाशके असलेली भाज्या आणि फळे देखील कर्करोगास कारणीभूत ठरू शकतात, त्यामुळे नेहमी भाज्या किंवा फळे नीट धुवून खावीत.
धातूचा वापर
आर्सेनिक, कॅडमियम, क्रोमियम, निकेल यासारख्या जड धातू मुख्य कार्सिनोजेन्समध्ये आहेत, जे डीएनएशी छेडछाड करतात आणि कर्करोगाच्या पेशी तसेच त्यांच्या मेटास्टेसिसच्या प्रक्रियेस प्रोत्साहन देतात, ज्यामुळे कर्करोग होण्याची शक्यता वाढते तसेच ती पसरते. त्यामुळे त्वचेचा कर्करोग आणि जठरासंबंधी कर्करोग होण्याची शक्यता वाढते. पालक, तांदूळ, फळांचा रस, मासे इत्यादी हेवी मेटलयुक्त पदार्थ जास्त प्रमाणात खाणे टाळावे.




