हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या रब्बी हंगाम चालू झालेला आहे.आणि रब्बी हंगामात खास करून गव्हाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. उत्तर, पूर्व आणि मध्य भारतामध्ये गव्हाच्या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. महाराष्ट्रात देखील अनेक ठिकाणी गव्हाची लागवड केली जाते. गव्हाच्या लागवडीसाठी ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून ते नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंतचा काळ चांगला असतो. जर तुम्ही अजूनही गव्याची पेरणी केली नसेल, आणि तुम्हाला गव्हाची लागवड करायची असेल, तर आज आम्ही तुम्हाला गव्हाच्या अशा काही वाणांबद्दल माहिती सांगणार आहोत. याची पेरणी तुम्ही 25 डिसेंबरपर्यंत करू शकता. तसेच त्या पुढील काळातही करू शकता. त्यातून तुम्हाला चांगले उत्पन्न देखील मिळेल.
गव्हाची काही नवीन वाण विकसित करण्यात आलेली आहेत. पंजाब, हरियाणा आणि राजस्थानच्या काही भागांमध्ये तसेच इतर भागात देखील या जातीची लागवड मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. या जातींची पेरणी तुम्हाला 25 डिसेंबर पर्यंत करता येते. DBW 316, PBW 833, DBW 107, HD 3118 JKW 261, PBW 752 या जातींची पेरणी करता येऊ शकते.
साधारणतः ऑक्टोबर नोव्हेंबर या महिन्यामध्ये गव्हाची पेरणी केली जाते. परंतु काही कारणास्तव जर तुम्हाला पेरणीला उशीर झाला असेल, तर गव्याच्या या जातीची पेरणी देखील करू शकता. त्या गव्हाच्या जातींची पेरणी उशिरा केली जाते. त्यामुळे मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थानमध्ये देखील गव्हाच्या या जातीची लागवड केली जाते. त्यामुळे तुम्ही विकत घेऊन डिसेंबरच्या अखेर पर्यंत पेरणी करू शकता. यातून तुम्हाला चांगले उत्पन्न देखील मिळेल.