हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आई होणे ही कोणत्याही स्त्रीसाठी सगळ्यात आनंदाची गोष्ट असते. निसर्गाने स्त्रीला दिलेलं हे एक वरदान आहे. गर्भधारणेपासून मूल जन्माला येईपर्यंत एका स्त्रीच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यामध्ये वेगवेगळे बदल देखील होत असतात. आजकाल अनेक स्त्रियांना जुळी मुलं होतात. विज्ञानानुसार असे म्हटले जाते की, जुळी मुलं होणं ही एक मनोरंजक आणि आश्चर्यकारक नैसर्गिक प्रक्रिया आहे. आईच्या पोटात दोन मुलं एकत्र विकसित होतात. ही एक आश्चर्याची गोष्ट आहे. जगामध्ये दरवर्षी जवळपास 1.6 दशलक्ष जुळी मुले जन्माला येतात. परंतु जुळी मुले जन्माला का येतात? आणि कोणत्या स्त्रियांना जुळी मुले होण्याची जास्त शक्यता असते? हे आपण जाणून घेऊयात.
जुळी मुले होण्याची कारणे
आयडेंटीकल ट्विन्स
ज्यावेळी स्त्रियांमधील एकच अंडपेशी दोन भागात विभागली जातात. त्यावेळी आयडेंटिकल ट्विन्स होतात. म्हणजेच यामध्ये दोन्ही मुले गुणसूत्रांच्या बाबतीत पूर्णपणे सारखीच असतात आणि दिसायला देखीलअगदी सेम दिसतात.
फ्रॅटर्नल ट्विन्स
ज्यावेळी महिलेच्या गर्भात दोन अंड पेशी दोन भिन्न शुक्राणू सोबत एकत्र येतात. त्यावेळी मुळे होतात. परंतु ही जुळी मुले सामान्यता वेगळी असतात. त्यांच्या गुणसूत्रांमध्ये 50% सारखेपणा असू शकतो. परंतु पूर्णपणे सारखी नसतात. या प्रक्रिये दोन्ही अंडी वेगवेगळ्या गर्भाशयात फलित होत असतात.
कोणत्या स्त्रियांना जुळी मुले होऊ शकतात
गुणसूत्रे
जर एखाद्या महिलेच्या कुटुंबात जुळी मुले जन्माला येण्याचा इतिहास असेल, तर त्या महिलेला देखील जुळी मुले होण्याची शक्यता असते
वय
ज्या महिलांना 30 ते 40 या वर्षांमध्ये पहिल्यांदा गर्भधारणा राहते. त्यांना सहसा जुळी मुले होण्याची शक्यता जास्त असते.
उंची आणि वजन
ज्या महिलांची उंची आजी वजन जास्त असते. अशा महिलांना देखील जुळी मुले होण्याची शक्यता जास्त आहे.
प्रजनन उपचार
IVF किंवा इतर प्रजनन उपचारांच्या मदतीने महिला गर्भवती झाली, तर अशावेळी जुळ्या मुलांना जन्म देण्याची शक्यता जास्त होते.
जुळी मुलं आहेत याची लक्षणे
जर तुमच्या पोटात जुळी मुलं असतील, तर तुम्हाला सकाळी सकाळी जास्त प्रमाणात थकवा जाणवतो. सामान्य वजनापेक्षा तुमचे वजन देखील जास्त होते. त्याचप्रमाणे तुम्हाला जर वारंवार आणि जास्त भूक लागत असेल, तर तुम्हाला जुळी मुलं होण्याची शक्यता आहे. वारंवार लघवी होणे हे देखील जुळे मुले असण्याचे एक लक्षण आहे.