आमच्या पोटात दुखतंय, हे त्यांना कळतंय कारण ते डॉक्टर नाहीत तर कंपाउंडर आहेत : चंद्रकांत पाटलांचा राऊतांना टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी रविवार थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्रं लिहिले. सरनाईक यांनी लिहलेल्या पत्रानंतर राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे. मुख्यमंत्र्याना सरनाईक यांनी लिहलेल्या पत्रातील दाव्याबद्दल खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या प्रतिक्रियानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी राऊत यांना टोला लगावला. आमच्या पोटात दुखतंय, आम्हाला झोप लागत नाही हे राऊतांना कळतंय. मात्र शिवसेनेत एकहाती सत्ता आहे. राऊत हे डॉक्टर नसून ते कंपाउंडर आहेत हे त्यांनी लक्षत घ्यावं,” असे पाटील यांनी म्हंटल आहे.

शनिवारी शिवसेनेचे प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहल्यानंतर राजकीय वर्तुळात या पत्रावरून अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत. याबाबत माध्यम प्रतिनिधींनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी संपर्क साधला. तसेच त्यांना याबाबत विचारणा केली असता पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली होती कि सत्ता गेल्यामुळे त्यांच्या पोटात दुखत आहे. त्यांना झोप लागत नाही. राऊत यांच्या टीकेला पाटील यांनी प्रत्युत्तर दिल आहे.

आंतरराष्ट्रीय योग्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रदेशाद्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यम प्रतिनिधींना प्रतिक्रिया दिली. शिवसेनेच्या हातामध्ये हात मिळवायचा कि नाही हे खासगी मध्ये जरी सर्व आमदारांना वाटलं तरी तो ठरवण्याचा अधिकार हा उद्धव ठाकरे यांना आहे. कारण शिवसेनेचा अधिकार हा एकहाती आहे. भाजपमधील नेत्यांना जरी वाटलं कि एकत्र यावं तरी आमच्या पक्षाचे अमित शहा व नरेंद्र मोदी यांनाच सर्व अधिकार हे निर्णय घेण्याचे आहेत. अशी प्रतिक्रिया पाटील यांनी दिली. तसेच सरनाईकांच्या पत्राबाबत त्यांना विचारणा केली असता पाटील म्हणाले कि, सरनाईकांनी जे पत्रात लिहले आहे. मात्र त्याचा सर्वस्वी निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना नाही तर उद्धव ठाकरे याना आहे. त्यांना वाटल्यास ते निर्णय घेतील.

Leave a Comment