भिवंडीत चोरटयांनी हॉटेलचे शटर उचकटून गल्ल्यावर मारला डल्ला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

भिवंडी : हॅलो महाराष्ट्र – मागील काही काळापासून भिवंडी शहरात चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. हे आरोपी चोर रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन दुकानांवर व घरांवर दरोडा टाकत असत. अशीच एक घटना भिवंडी शहरातील कणेरी परिसरामध्ये घडली आहे. या ठिकाणी चोरटयांनी मुक्कदर हॉटेलचं शटर उचकटून हॉटेलमधील गल्लाच लंपास केला आहे. हि संपूर्ण घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

काय आहे प्रकरण ?
भिवंडी शहरातील कणेरी परिसरात मुक्कदर नावाचं एक हॉटेल आहे. आरोपी चोरट्यानं 30 जानेवारी रोजी रात्री अडीचच्या सुमारास हॉटेलचं शटर उचकटून आतमध्ये प्रवेश केला होता. यादरम्यान हॉटेलमध्ये एक व्यक्ती झोपला होता. पण आरोपीने चोर पावलाने आतमध्ये प्रवेश करत सर्व पैशांसह गल्ला लंपास केला. यावेळी आरोपीने त्या झोपलेल्या व्यक्तीचा मोबाइल देखील लंपास केला केला. हि संपूर्ण घटना त्या ठिकणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरु केला आहे.

या व्हिडिओमध्ये दिसत आहे कि, आरोपी चोर अत्यंत शिताफीने शटर उचकटताना दिसत आहे. हॉटेलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी त्याने आसपास आपल्याला कोणी पाहत तर नाही ना? याची चाचपणी केली. यानंतर त्याने चोर पावलाने आतमध्ये प्रवेश केला. आरोपीने ज्या पद्धतीने चोरी केली ते पाहता तो एक सराईत चोर असल्याचे समजत आहे. पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.

Leave a Comment