सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या मांढरदेवी देवस्थानच्या काळुबाई मंदिरात दानपेटी फोडण्याचा चोरट्यांकडून प्रयत्न करण्यात आला. मात्र, दानपेटी फोडताना आवाज झाल्याने त्याला त्या ठिकाणावरून पळ काढावा लागला आहे. हा चोरीचा प्रयत्न सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.
मांढरदेवी मंदिरात मंदिर व्यवस्थापनाचे स्वतःचे सुरक्षा रक्षक तैनात असतात. ते असताना हा सगळा प्रकार घडला. दानपेटी फोडण्यासाठी चोरट्याने वापरलेली हत्यारे पोलिसांना सापडली. मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेरातील फुटेजही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सध्या पोलिसांकडून चोरट्याचा शोध घेतला जात आहे.
मांढरदेव मंदिरात दानपेटी फोडण्याचा चोरट्यांकडून प्रयत्न#hellomaharashtra pic.twitter.com/uvviKP5jAY
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 6, 2022
दररोज रात्री 11 ते पहाटे 5 या वेळेत मंदिर बंद असते. नेमक्या याच गोष्टीचा फायदा घेऊन चोरांनी मध्यरात्रीच्या सुमारास मंदिरात प्रवेश करत चोरीचा प्रयत्न केला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिसांकडून केला जात आहे.