साताऱ्यात रस्त्यावर बोलणाऱ्या लोकांचे मोबाईल हिसकावणाऱ्या चोरट्यांना अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा शहरामधील विविध ठिकाणी मोटारसायकलवरून येवून रोडने फोनवर बोलत जाणाऱ्या लोकांचे मोबाईल हिसकावण्याचे प्रकार घडत होते. सदर चोरट्यांचे ठावठिकाण्याची तसेच तांत्रिक माहिती प्राप्त करून सातारा डी. बी. पथकाने सातारारोड, आंबवडे, पाडळी, कोरेगाव या ठिकाणाहून चोरट्यांना ताब्यात घेतले. या चोरट्यांकडून 11 मोबाईलसह 2 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहर हद्दीत मोबाईल हिसकावून चोरीचे प्रमाण वाढले होते. याबाबत सातारा शहर पोलीस ठाणेस गुन्हे दाखल होते. सदर चोरट्यांना पकडणेबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर, महिला पोलीस निरीक्षक श्रीमती वंदना श्रीसुंदर यांनी सातारा गुन्हे प्रकटीकरण पथकास सदरचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत सुचना दिल्या. त्याअनुषंगाने सातारा डी. बी. पथकातील पोलीस स्टाफने सातारा शहरामध्ये पेट्रोलिंग करून सदर चोरट्यांची माहिती प्राप्त केली. दि. 09 जुलै रोजी सदर चोरट्यांचे ठावठिकाणा घेवून सातारारोड, आंबवडे, पाडळी, कोरेगाव अशा ठिकाणाहून ताब्यात घेतले. या प्रकरणात जबरी चोरी केलेले एकूण 11 मोबाईल तसेच गुन्हयात वापरेल्या दोन मोटारसायकल असा एकूण 1 लाख 87 हजार रुपयांचा माल हस्तगत केला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधिक्षक अजय बो-हाडे, सहा. पोलीस अधिक्षक आँचल दलाल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर, महिला पोलीस निरीक्षक श्रीमती. वंदना श्रीसुंदर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, पो.ना. सुजित भोसले, अविनाश चव्हाण, ज्योतीराम पवार, पंकज ढाणे, अभय सावळे, विक्रम माने, गणेश भोंग, सागर गायकवाड, गणेश घाडगे, संतोष कचरे यांनी केलेली आहे.

Leave a Comment