साताऱ्यात माॅर्निंग वाॅकला गेलेल्या सेवानिवृत्त तलाठ्याला चोरट्यांनी लुटले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | माॅर्निंग वाॅकला निघालेल्या एका वृध्दाला दुचाकीवरून आलेल्या युवकाने पोलिस असल्याचे सांगून दागिने घेवून चोरट्याने पलायन केले. ही घटना सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तानाजी परबती संकपाळ (वय- 59, रा. कुशी दत्तनगर, नागेवाडी, ता. सातारा) हे दोन दिवसांपूर्वी साताऱ्यातील सदर बझार येथे राहणाऱ्या आपल्या मुलाकडे आले आहेत. सोमवारी सकाळी ते जरंडेश्वर नाक्यावरील मारुती मंदिराजवळून ते माॅर्निंग वाॅकला निघाले होते. त्यावेळी दुचाकीवरून एक युवक तेथे आला. ‘मी पोलीस असून, चोरी झाली असल्यामुळे आमची तपासणी सुरू आहे. तुम्ही इकडे या तुम्हाला चेक करायचे,’ आहे असे म्हणून तानाजी संकपाळ यांना त्याने बोलावून घेतले. त्या चोरट्याने गाडीवर बसूनच संकपाळ यांना तुमच्याकडे दागिने असतील तर या रुमालात ठेवा, असे सांगितले.

त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून संकपाळ यांनी गळ्यातील साेन्याची चेन आणि अंगठी, मोबाईल काढून त्याच्याजवळ दिले. त्यानंतर त्या चोरट्याने रुमालात दागिने ठेवण्याचा बहाणा करून तो तेथून पसार झाला. पुढे गेल्यानंतर संकपाळ यांनी रुमाल उघडला असता रुमालात केवळ मोबाईल असल्याचे दिसले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. तानाजी संकपाळ हे सेवानिवृत्त असून, ते तलाठी पदावर कार्यरत होते.

Leave a Comment