पुसेसावळीत देवाच्या दानपेट्यावर चोरट्यांचा डल्ला, तीन मंदिरात अज्ञातांकडून चोरी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

पुसेसावळी येथे मंदिरातील दानपेट्यावर अज्ञात चोरट्यांनी हातसफाई केलेली आहे. एक नव्हे तर तीन मंदिरातील दानपेट्यांची तोडफोड करून देणगी रक्कम लंपास केली आहे. या प्रकारामुळे ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त करत चोरट्यांचा शोध घेण्याची मागणी केलेली आहे.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथे आज शनिवारी दि. 25 रोजी पहाटे मंदिरात पुजेसाठी आलेल्या पुजाऱ्यांना दानपेट्या फोडल्याचे निदर्शनास आले. येथील तुळजाभवानी भवानी माता मंदिर, श्री दत्त मंदिर आणि श्री गणपती मंदिर या तीन ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी दानपेट्यांची तोडफोड करून रक्कम लंपास केली. याबाबतची माहिती गावात समजताच लोकांनी घटनेची माहिती मंदिरात येवून घेतली.

मंदिरात पहाटे पुजेनिमीत्त आलेल्या पुजाऱ्यांच्या निदर्शनास दानपेट्या अस्ताव्यस्त पडल्याचे दिसून आले. त्यानंतर सदरची बाब संबंधित विश्वस्तांनी औंध पोलिसांना कळवली. त्यानंतर औंधचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत बधे यांनी सहकार्यासोबत येवून तातडीने संबंधित मंदिरांची पाहणी केली. औंध पोलीस ठाण्यात अज्ञाताविरूद्ध तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Leave a Comment