घराचा कडी- कोयंडा उचकटून चोरट्यांनी 15 लाख 80 हजारांचा मुद्देमाल लंपास केला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

फलटण | पवारवाडी (ता. फलटण) येथील एका घरातील कडी-कोयंडा अज्ञात चोरट्यांनी उचकटून आत प्रवेश करून १५ लाख ८५ हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेली माहीती अशी, पवारवाडी येथील चंद्रकांत दत्ताजीराव पवार यांच्या घरात (दि. १९) रात्री दीड ते पहाटे साडेपाचच्या दरम्यान चोरी झाली आहे. पवारवाडी येथील त्यांच्या घराच्या पाठीमागील किचन रूम शेजारील खोलीच्या दरवाजाचा आतील कडी-कोयंडा काढून चोरट्यांनी कपाटातील तीन वेगवेगळ्या पर्समध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने व चार लाख रुपयांची रोख रक्कम असा एकूण १५ लाख ८० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.

घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी भेट देऊन पाहणी केली. अधिक तपास पोलीस निरीक्षक नितीन सावंत करीत आहेत.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment