दोनवेळा चोरी : फलटणच्या सभापतीच्या बंगल्यातील 15 लाखांवर चोरट्याचा डल्ला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

फलटण | फलटण तालुक्यातील आसू येथील बंगल्यातून 15 लाख रूपयांवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. एकाच बंगल्यात आठवड्यात दोनवेळा चोरी करत ही रक्कम लंपास केली आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आणि फलटण पंचायत समितीचे सभापती शिवरुपराजे खर्डेकर यांच्या आसू येथील बंगल्यातून चोरट्यांनी हा मुद्देमाल लंपास केला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, चोरट्यांनी ही चोरी दोन टप्प्यांत केली असून चोरट्यांनी त्याचा मागमूसही लागू दिलेला नाही. चोरीची पहिली घटना 12 जुलै तर दुसरी घटना 19 जुलैला घडली आहे. आठवडाभरात दोनदा पैशाची माहित असणारानेच चोरी केली असल्याचा पोलिसांचा संशय आहे. आसू येथे शिवरुपराजे खर्डेकर यांचा बंगला आहे. शेतीच्या कामासाठी पैशांची गरज असल्याने दि. 6 जुलै रोजी त्यांनी 7 लाख रुपये रक्कम आपल्या रूममधील कपाटात आणून ठेवली होती. कपाटातील पैसे काही दिवसात चोरट्यांनी लंपास केले, मात्र त्यांना याची त्यांना कल्पनाही नव्हती. कपाटातील 7 नाखांची रक्कम गायब झाल्याचे त्यांना सोमवार दि. 12 जुलै रोजी लक्षात आले.

दरम्यान, त्यांनी पैशाबाबत घरातील सर्वांना विचारले. रक्कम गायब झाल्याची बाहेर कोठेही वाच्यता केली नाही. काही दिवासांनंतर म्हणजेच गुरुवार दि. 29 जुलै रोजी त्यांच्या सुनबाईंच्या रुममधील कपाटातून 5 लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिनेही चोरीस गेल्याचे लक्षात आले. याप्रकारानंतर मात्र शिवरुपराजे खर्डेकर यांनी पोलिस ठाण्यात धाव घेवून अज्ञाता विरोधात फिर्याद दाखल केली आहे. तपास पोलिस निरीक्षक नितिन सावंत करत आहेत.

Leave a Comment