तिसरा राजीनामा आठ दिवसांत, भाजपाचे सरकार स्वबळावर येणार ः चंद्रकांत पाटील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यात भाजपाचे स्वबळावर सरकार येणार आहे, त्यासाठी कुबड्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या कर्माने मरणारं आहात. येत्या आठ दिवसांत तिसरा राजीनामा होणार असून आम्ही २०२४ मध्ये स्वबळावर सरकार स्थापन करू असा इशारा महाविकास आघाडी सरकारला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

२०१९ साली आम्ही १६४ जागा  लढविल्या होत्या, आता २०२४ मध्ये २८८ जागा लढविल्या तर आम्ही २ कोटीपेक्षा जास्त मते मिळवू शकतो. जर सर्वांच्या विरूध्द केवळ भाजपा असा लढायचं असेल तर अतिशय सोप गणित आहे. आम्ही स्वबळावर सरकार स्थापन करू.

राज्यकर्ते लाॅकडाऊन जनतेशी फसवणूक करत आहे. पूर्ण लाॅकडाऊनच नोटीफिकेशन काढले हे भाजपा सहन करणार नाही. केवळ वीकेंड लाॅकडाऊन म्हणाले होते, मात्र नोटीफिकेश वेगळे असे का?

You might also like