हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही जगातील सगळ्यात मोठी प्रगती आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून आजकाल अनेक गोष्टी अगदी सोप्या झालेल्या आहे. कंपन्या देखील AI च्या मदतीने त्यांच्या व्यवसायामध्ये प्रगती करत आहेत. तेवढेच नाहीतरी अगदी आपल्या दैनंदिन जीवनात देखील AI चा वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. अगदी प्रत्येक क्षेत्रामध्ये AI चा वापर सध्या वाढत चाललेला आहे. शैक्षणिक असो, व्यावसायिक असो किंवा इतर कुठलेही क्षेत्र असो. यामध्ये AI खास भूमिका बजावत आहेत. या सगळ्यामुळेच आपले जीवनमान अगदी सोपे झाले आहे. अशातच आता एक आश्चर्यकारक घटना घडली आहे. ती म्हणजे प्रीमियम किचन प्रॉडक्ट्स विकणारी कंपनी वंडर शेफने चक्क स्वयंपाक करणारा एक रोबोट (AI Robot) तयार केलेला आहे.
या कंपनीने माहिती दिली आहे की, हा एक किचन रोबोट आहे. ज्याला शेफ मॅजिक असे नाव आहे. हा रोबोट घरात स्वयंपाक करेल, असे देखील या कंपनीने म्हटलेले आहे. वंडरशेफचे संस्थापक आणि सीईओ रवी यांनी या नवीन रोबोटबद्दल माहिती दिलेली आहे. जून महिन्यापासून हा रोबोट भारतात इतर देशांमध्ये उपलब्ध होणार आहे. असे देखील त्यांनी त्यांच्या वक्तव्यामध्ये सांगितलेले आहे.
रोबोट करणार 200+ रेसिपी तयार
या मॅजिक सेफ रोबोटमध्ये सेलिब्रिटी शेफ संजीव कपूर यांच्या 200 पेक्षा जास्त रेसिपीज लोडेड केलेल्या आहेत. त्यामुळे यापैकी कोणतीही रेसिपी तो अगदी सहजपणे करू शकतो. यामध्ये इंडियन, वीगन, जैन, कॉन्टिनेन्टल, थाय, चायनीज, इटालियन, मेक्सिकन, शाकाहारी, आयुर्वेदिक, मधुमेह, हृदयरोग यांसारख्या आजार असणाऱ्या व्यक्तींसाठी देखील खास रेसिपी या रोबोटमध्ये लोड केलेल्या आहेत.
या हा रोबोट वापरात आल्यावर मानवाच्या जीवनात एक अमुलाग्र बदल घडणार आहे. या रोबोटवर एक टचस्क्रीन असणार आहे. आणि या टचस्क्रीनच्या माध्यमातून तुम्ही तुम्हाला पाहिजे ती रेसिपी निवडू शकता. हा रोबोट एक कनेक्टेड डिवाइस आहे. त्यामुळे तुम्हाला पाहिजे ती रेसिपी तुम्ही त्याला कमांड देऊन तो करू शकतो. त्याचप्रमाणे भविष्यात जाऊन दर आठवड्याला नवीन रेसिपी देखील यामध्ये अपलोड करण्यात येईल. असे देखील सांगण्यात आलेले आहे. या रोबोटला तुम्ही वायफायने देखील कनेक्ट करू शकता आणि तुमच्या रेसिपी डाउनलोड करू शकता.
हा रोबोट कसा करतो काम?
या रोबोटवर असणाऱ्या टच स्क्रीनच्या मदतीने तुम्हाला हवेतील रेसिपी सिलेक्ट करायची आहे.
ही रेसिपी सिलेक्ट केल्यावर स्क्रीनवर जे काही साहित्य दिसते ते साहित्य त्या मशीनमध्ये टाकायचे आहे.
हे साहित्य मशीनमध्ये टाकल्यावर त्या साहित्याचे वजन करणे, भाज्या चिरणे, भाज्या मिक्स करणे, उकळणे, ब्लेंड करणे, भाजणे, तळणे या सगळ्या प्रक्रिया मशीन स्वतःच करणार आहे.
त्याचप्रमाणे जर कधी या मशीनमध्ये बिघाड झाला तर तुम्ही मोबाईलच्या ॲपच्या मदतीने या मशीनची दुरुस्ती करू शकता.
त्याचप्रमाणे तुमच्या स्वतःच्या स्थानिक रेसिपी देखील तुम्ही या रोबोटमध्ये सेव करू शकता.
बॅचलर्सना लोकांना होणार फायदा
शेफ संजीव कपूर यांनी सांगितले की, आजकाल अनेक लोकांना त्यांच्या कामानिमित्त तसेच शिक्षणानिमित्त बाहेरगावी जावे लागते. यावेळी ते बाहेरचे खाणे खाण्याला जास्त प्राधान्य देतात अनेकदा. काही लोकांना जेवण बनवता येत नाही, तर अनेक लोकांना वेळ नसल्यामुळे ते बाहेरचे जेवण खातात. परंतु आता त्यांच्यासाठी हा शेफ मॅजिक एक उत्तम पर्याय असणार आहे. कारण या शेफ मॅजिकच्या मदतीने त्यांना पाहिजे तो पदार्थ ते घरात बनवून खाऊ शकतात.
रोबोटची किंमत
या रोबोटची किंमत सध्या 59 हजार 999 रुपये आहे. परंतु जर तुम्ही प्री-बुक केले, तर यावर 10 हजार रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे. यासाठी तुम्हाला 5 हजार रुपये भरून प्री-बुक करावे लागेल. आणि त्यानंतर हा रोबोट तुम्हाला 49 हजार 999 रुपयांना विकत मिळणार आहे. तुम्ही वंडर शेपच्या अधिकृत वेबसाईट वरून देखील हा रोबोट प्रिबूक करू शकता. या रोबोटचा डिलिव्हरी टाईम 45 दिवसांचा असणार आहे.