विधानसभेत विठुरायाचा जयघोष!! राज्य सरकारकडून वारकऱ्यांसाठी या महत्त्वाच्या घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2024-25) सादर केला आहे. या अर्थसंकल्पाची सुरुवातच त्यांनी आज तुकाराम महाराजांच्या अभंगाने केली. यानंतर अजित पवारांनी वारकऱ्यांसाठी महत्त्वाच्या घोषणा केल्या. या घोषणा नेमक्या कोणत्या आहेत? याविषयी जाणून घ्या.

वारकऱ्यांसाठी केलेल्या घोषणा

1) आजच्या अधिवेशनात अजित पवार यांनी घोषणा केली आहे की, वारीसाठी येणाऱ्या प्रति दिंडीला २० हजार निधी दिला जाईल.

2) यासह निर्मल वारीसाठी ३६ कोटी ७१ लाख रूपयांचा निधी देण्यात येईल.

3) आळंदी ते पंढरपूर या दोन्ही पालखी मार्गावरील वारकऱ्यांना मोफत तपासणी आणि औषधोपचार देण्यात येईल.

4) पढंरपूरच्या वारीचा जागतिक वारसा नामांकनासाठी यूनेस्कोकडे प्रस्ताव पाठवण्यात येईल.

दरम्यान, आजच्या अर्थसंकल्पामध्ये राज्य सरकारने महिलांसह शेतकऱ्यांसाठी देखील महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महत्वाचे म्हणजे, आषाढी वारीच्या काळातच सरकारकडून अर्थसंकल्प सादर करण्यात आल्यामुळे या अर्थसंकल्पात वारकऱ्यांना देखील स्थान देण्यात आले आहे. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर सरकारने वारकऱ्यांसाठी या महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत.