‘ही’ बँक भारतात सुरु करत आहे Cryptocurrency चा व्यवसाय, आता करन्सीच्या बदल्यात मिळणार कर्जाची देखील सुविधा

नवी दिल्ली । सर्वोच्च न्यायालयाने आता भारतातील क्रिप्टोकरन्सीवरील बंदी हटविली आहे. 2018 मध्ये आरबीआयने क्रिप्टोकरन्सीवर लादलेली बंदी सर्वोच्च न्यायालयाने मार्च 2020 मध्ये काढून टाकली होती. यानंतर, आता देशातील पारंपारिक बँकिंग सिस्टिम देखील क्रिप्टो करन्सी व्यवसाय सुरू करीत आहे. Indian bank United Multistate Credit Co. Operative Society ने आता क्रिप्टोकरन्सी आणि क्रिप्टोकर्न्सी उत्पादनांद्वारे आपली बँकिंग सेवा वाढविण्याची योजना आखली आहे. इंडियन बँक युनायटेड भारतात आपल्या ग्राहकांना ऑनलाइन क्रिप्टोकरन्सी बँकिंग सेवा प्रदान करेल.

इंडियन बँक युनायटेडने Cashaa बरोबर पार्टनरशिप केलेली आहे
क्रिप्टो बँकिंग सेवा प्रदाता Cashaa च्या सहकार्याने इंडियन बँक युनायटेडने UNICAS नावाचे एक जॉईंट वेंचर तयार केले आहे, जे उत्तर भारतातील बँकेच्या सर्व 34 शाखांना ऑनलाइन क्रिप्टो बँकिंग सेवा आणि फिजिकल सेवा प्रदान करेल. युनायटेड आणि काशा यांनी अशा वेळी क्रिप्टोकरन्सी बँकिंग सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे जेव्हा भारतातील नियम व कायदे स्पष्ट नाहीत.

आता भारतात क्रिप्टो करन्सी खरेदी-विक्रीचा व्यवसाय होऊ शकतो
रिझर्व्ह बँकेने 2018 मध्ये भारतातील क्रिप्टो करन्सीच्या व्यवसायावर बंदी घातली होती, जी सर्वोच्च न्यायालयाने मार्च 2020 मध्ये काढून टाकली होती. म्हणजेच आता क्रिप्टो करन्सी खरेदी-विक्रीचा व्यवसाय भारतात करता येईल. असे असूनही देशातील बँकांनी अद्याप यामध्ये फारसा रस दाखविलेला नाही.

बँक खात्याला थेट क्रिप्टोकरन्सी वॉलेटसह इंटिग्रेट करण्याची सुविधा
UNICAS इंडियन बँक युनाइटेडन बँकेचे अकाउंट होल्डर्स त्यांच्या बँक खात्याला थेट क्रिप्टोकर्न्सी वॉलेटमध्ये इंटिग्रेट करण्याची परवानगी देईल. याद्वारे ग्राहकांना त्यांच्या बँक खात्यातून थेट रोख रक्कम देऊन बिटकॉइन (Bitcoin- BTC), ईथर (Ether- ETH), रिप्पल (Ripple- XRP) आणि काशा (Cashaa- CAS) सारख्या क्रिप्टो करन्सी खरेदी करता येतील. याशिवाय इंडियन बँक युनायटेडचे ​​खातेदार क्रिप्टोकरन्सीच्या बदल्यात कर्ज घेण्यास सक्षम असतील. काशा कुमारचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार गौरव म्हणाले की, भारतात क्रिप्टोकरन्सीचा ट्रेंड वाढला आहे, म्हणूनच आम्ही इंडियन बँक युनायटेडसह UNICAS सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ते म्हणाले की, भारतातील बर्‍याच क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजमध्ये 200 टक्क्यांनी ते 400 टक्क्यांची वाढ झाली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like