अमित शहांच्या विरोधात काँग्रेसकडून हा उमेदवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दिल्ली प्रतिनिधी / काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी गुजरात गांधीनगर येथील आपल्या उमेदवाराची घोषणा केली. भाजपकडून अमित शहा गुजरात मधील गांधीनगर येथून लोकसभा निववडणूक लढणार आहेत.गुजरातचे माजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डॉ. सी. जे. चावडा यांना मैदानात उतरवण्यात आले आहे. चावडा उत्तर गांधीनगरमधून आमदार आहेत.

काँग्रेसचे उमेदवार आणि आमदार सी. जे. चावडा यांनी आपली सरकारी नोकरी सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. असे असूनही ते २ वेळा आमदार म्हणून निवडून आले आहे. गांधीनगरमधून निवडणुकीसाठी उतरलेले शाह आणि चावडा हे एकाच गावचे रहिवासी तर आहेच, तसेच ते एकाच गावचे जावईदेखील आहेत. त्यामुळे त्यांच्या मतांवर याचा परिणाम होणार आहे.

अमित शहा आणि चावडा हे गांधीनगरमधील मानसा येथील रहिवासी आहेत.मात्र मानसा गाव गांधीनगर लोकसभा मतदारसंघात येत नसून महेसाणा मतदारसंघात येते. त्यामुळे या दोन्ही उमेदवारांना आपल्या नातेवाईकांच्याच मतांना मुकावे लागणार आहे. दोघांच्याही गावातील मतदारांना या उमेदवारांना मतदान करता येणार नाही.

इतर महत्वाचे –

या सरकारने आपल्याला भिकेला लावले : उदयनराजे भोसले

मावळ गोळीबारात मी दोषी असल्यास राजकारण सोडेल : अजित पवार

म्हणून पत्नीच्या हातून झाला पतीचा खून

Leave a Comment