हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल अनेक लोक हे अत्याधुनिक पद्धतीने शेती करायला लागलेले आहेत. पारंपरिक पद्धतीचा अवलंब न करता ते अत्याधुनिक तंत्रांचा वापर करतात. आणि या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ते योग्य पद्धतीने शेती करू शकता. आजकाल तरुण पिढी देखील शेतीमध्ये उतरत आहे. आणि ते शेतीत नवनवीन प्रयोग करायला लागलेले आहेत. यातून त्यांना अगदी सोप्या पद्धतीने शेती करता येते. आणि चांगला नफा देखील होत आहे.
तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आता शेतीच्या व्यवसायात प्रगती व्हायला लागलेली आहे. अशातच आता इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी महात्मा फुले कृषी विज्ञान केंद्र आणि राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राच्या तज्ञांच्या सहाय्याने काळ्या द्राक्षांची वाणांची निर्मिती केलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होत आहे.
इंदापूर तालुक्यातील काही द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी महात्मा फुले कृषी विज्ञान केंद्र आणि राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राच्या तज्ञांच्या मार्गदर्शनाने द्राक्ष शेतीमध्ये ही एक नवीन प्रगती केलेली आहे. त्यांनी स्वतः काळ्या द्राक्षाची वाणाची निर्मिती केली आहे. शेतकऱ्यांकडून देखील द्राक्षांच्या या वाणाला चांगलीच पसंती मिळताना दिसत आहे. इंदापूर तालुक्यात सगळ्यात जास्त द्राक्षांची लागवड केली जाते. या तालुक्यातील द्राक्ष अत्यंत महाग द्राक्ष म्हणून ओळखली जातात. येथील द्राक्षाला जवळपास प्रति किलोला 135 ते 170 रुपये एवढा दर मिळतो.
इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी हे काळ्या द्राक्षांची नवीन वाण निर्माण केलेली आहे. त्याचा फायदा सगळ्यांनाच होत आहे. ही द्राक्ष लागवड केल्यानंतर अत्यंत कमी वेळात तयार होतात. शेतकऱ्यांनीन उत्कृष्ट आकार आणि चांगली चव असलेली द्राक्षांचे वाणविकसित केलेले आहे. शेतकऱ्यांनी उत्परिवर्तन या पद्धतीचा वापर करून ही द्राक्षांची वाण विकसित केलेली आहे.