चुकीच्या जाहिरातींसाठी ‘या’ चित्रपटाच्या अभिनेत्याला ठोठावण्यात आला दंड, ग्राहक कोर्टाने म्हणाले की…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

थ्रिसूर । केरळमधील ग्राहक कोर्टाने एका फिल्म अभिनेत्यावर हेअरक्रीम प्रॉडक्टसाठी (Hair Cream Product) दिलेल्या जाहिरातीमध्ये चुकीचा दावा केल्याचा ठपका ठेवला आहे. हा चित्रपट अभिनेता या हेअर प्रॉडक्टचा काय परिणाम होतो हे जाणून घेतल्याशिवायच त्याचे समर्थन करत होता. थ्रिसूरच्या ‘जिल्हा ग्राहक निवारण मंच’ ने ‘Dhathri Hair cream’ या कंपनीला आणि फिल्म अभिनेता अनूप मेनन (Anoop Menon) याना 10-10 हजार रुपये दंड ठोठावला आहे. वास्तविक, फ्रान्सिस वडक्कन नावाच्या व्यक्तीने ए-वन मेडिकल्स, धात्री आयुर्वेद प्रायव्हेट लिमिटेड आणि अनूप मेनन यांच्याविरूद्ध तक्रार दाखल केली होती.

नफा मिळाल्यास 5 लाख रुपयांची भरपाई द्यावी अशी मागणी केली
या तक्रारीत वडक्कन म्हणाले की, जानेवारी 2012 मध्ये त्याने पहिल्यांदा हेअरक्रीम 376 रुपयात खरेदी केले होते. त्याने एक जाहिरात पाहिल्यानंतर हे हेअर क्रीम विकत घेतली, ज्यात अनूप मेनन वचन देतो की, जर हे प्रॉडक्ट 6 आठवड्यांसाठी वापरले गेले तर केसांची वाढ झाल्याचे दिसून येईल. परंतु, ही हेअरक्रीम वापरल्यानंतरही त्यांना कोणताही फायदा झाला नाही. यानंतर त्यांनी फोरममध्ये तक्रार दाखल केली आणि पाच लाख रुपयांची भरपाई मागितली.

https://t.co/EIwcjWMcjU?amp=1

अनूप मेनन काय म्हणाले?
लाइव्हलॉच्या एका अहवालात असे म्हटले आहे की, फोरमकडून आलेल्या उत्तरात अनूप मेनन यांनी कबूल केले की, त्याने हे प्रॉडक्ट कधीही वापरलेले नाही. तो केवळ त्याची आई द्रवाराने तयार केलेले हेअर ऑईलच वापरतो. मेनन म्हणाले,’मी हे प्रॉडक्ट कधीही वापरलेले नाही. मी फक्त माझी आई द्रवाराने तयार केलेलेच हेअर ऑईल वापरतो. त्याने सांगितले की, या जाहिरातीमध्ये काय सांगितले जात आहे याबद्दल आपल्याकडे कोणतीही माहिती नाही कारण ती मॅन्युफॅक्चररची ‘स्टोरी’ होती. त्यांना वाटले की, हे प्रॉडक्ट केसांच्या वाढीसाठी नाही तर केसांची निगा राखण्यासाठी आहे.

https://t.co/maJNlnXbuO?amp=1

मंच काय म्हणाले?
मंचाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, एंबेसिडरने हे प्रॉडक्ट वापरलेले नाही. तसेच, या जाहिरातीमध्ये दिलेली आश्वासने आणि प्रॉडक्ट वापरण्याच्या परिणामातही फरक आहे. कोर्टाने असेही म्हटले आहे की, या प्रॉडक्टमध्ये दिलेल्या स्लिपमधील चेतावणी अशा प्रकारे छापली गेली आहे की, ती आरामात वाचता येत नाही. कोर्टाने असे म्हटले आहे की, “या तक्रारीत आयुर्वेदिक औषधांच्या परिणामकारकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले नाही. पण खरा प्रश्न असा आहे की, हे प्रॉडक्ट वापरल्यानंतर जाहिरातीमध्ये केलेल्या दाव्यांप्रमाणे निकाल लागलेला नाही.

https://t.co/S0O7oEHayW?amp=1

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment