आदित्य ठाकरे यांनी ‘या’ दिग्गज इलेक्ट्रिक कार कंपनीला भारतात येण्याचे दिले आमंत्रण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । शिवसेनेचे नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी सांगितले की, त्यांनी आपल्या राज्यात येण्यासाठी एलोन मस्क यांना आमंत्रित केले आहे. इलोन मस्क हे टेस्ला इंक या इलेक्ट्रिक कार कंपनीचे संस्थापक आहेत. आदित्य ठाकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली आहे.

ट्वीटमध्ये आदित्य ठाकरे म्हणाले की, त्यांनी महाराष्ट्रात टेस्ला कंपनीला बोलवण्यासाठी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासमवेत व्हिडीओ कॉलवर मस्क यांच्याशी बोललो आहे.

https://twitter.com/AUThackeray/status/1319303674967977984?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1319303674967977984%7Ctwgr%5Eshare_3%2Ccontainerclick_0&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news18.com%2Fnews%2Fbusiness%2Faaditya-thackeray-invites-elon-musk-tesla-to-maharashtra-stresses-importance-of-electric-mobility-3306310.html

सतत नवनवीन धोरणे सादर करत महाराष्ट्र सरकार राज्याच्या शाश्वत विकासासाठी काम करीत आहे यावरही ठाकरे यांनी भर दिला.

https://twitter.com/AUThackeray/status/1319303674967977984?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1319303957953458176%7Ctwgr%5Eshare_3%2Ccontainerclick_1&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news18.com%2Fnews%2Fbusiness%2Faaditya-thackeray-invites-elon-musk-tesla-to-maharashtra-stresses-importance-of-electric-mobility-3306310.html

आदित्य ठाकरे यांच्या ट्विटला उत्तर देताना एलोन मस्क यांनी लिहिले, ‘पुढच्या वर्षी नक्कीच’. या ट्विटसह त्यांनी टी-शर्टचा फोटोही शेअर केला होता, ज्यात ‘India wants Tesla’.असे लिहिले आहे. त्यांनी प्रतीक्षा केल्याबद्दल आभारही मानले आहे.

टेस्ला पुढच्या वर्षी भारतात येऊ शकेल
या महिन्याच्या सुरूवातीस, टेस्ला इंकचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलोन मस्क यांनी सूचित केले की, त्यांची कंपनी 2021 पर्यंत भारतीय बाजारपेठेत धडक देऊ शकेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या वापरावर आणि मॅन्युफॅक्चरिंगवर करण्यावर भर देत आहेत.

ऑटो सेक्टरची अवस्था बिकट
गेल्या एका वर्षात भारतीय ऑटो सेक्टरची अवस्था बिकट झाली आहे. त्याशिवाय मागणीमध्ये सतत घट होत आहे. यानंतर, कोरोना व्हायरसच्या साथीने कार उत्पादकांची स्थिती आणखीनच खराब केलेली आहे. आता या कंपन्यांना विक्री वाढविण्यासाठी सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे.

https://t.co/7ZUh8Nb5rG?amp=1

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment